Pune Crime | सूसमध्ये अतिक्रमण विभागाच्या गाडीवर दगडफेक

पुणे : Pune Crime | फुटपाथवर बेकायदेशीर व्यवसाय करीत असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने (PMC Encroachment Department) कारवाई करुन माल उचलला. त्यात अडथळा आणून अतिक्रमणाच्या गाडीवर दगडफेक करण्याचा प्रकार सूसमधील शिवशक्ती चौकात घडला. (Pune Crime)

याप्रकरणी सहायक अतिक्रमण निरीक्षक राकेश काची यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५२५/२२) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रिया बागल (वय २०), राणी बागल (वय ४०), बाळु बागल (वय ४५, सर्व रा. सूस रोड) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बुधवारी पावणेसहा वाजता पाषाण येथील शिवशक्ती चौकात घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश काची हे औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयात सहायक अतिक्रमण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. पाषाण येथील शिवशक्ती चौकात अतिक्रमण विभागाची बेकायदेशीर व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी बागल हे फुटपाथवर फळभाजी घेऊन बसले होते. त्यांचे साहित्य महापालिका कर्मचारी ज्ञानेश्वर जाधव, श्रीकांत भालेकर, नारायण चव्हाण, प्रशांत कड, विशाल केंदगिरी, लोकेश ढावरे हे जप्त करुन ताब्यात घेत होते. त्यावेळी बागल यांनी त्यांना विरोध केला. सरकारी कामात अडथळा निर्माण करुन शिवीगाळ केली. अतिक्रमण विभागाच्या ट्रकवर दगडफेक केली. पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Stone pelting on vehicle of encroachment department in Sus road

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Health Department | कोरोना काळातील कंत्राटी 597 परिचारिकांसाठी खूश खबर; महाराष्ट्र सरकार करणार कायमस्वरूपी सेवेत रुजू

Pune Police | सर, हम कामकाज देखें क्या? पुण्यातील नवनियुक्त उपायुक्त म्हणाले – ‘दुबारा इधर मत दिखना, छोडूंगा नही’, जाणून घ्या प्रकरण

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश