Pune Crime | ‘दुल्हे राजा’ सिनेमाची कहाणी पुण्यात ! हॉटेल चालकाने टपरीवाल्यावर तलवारीने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pune Crime | गोविंदा कादरखानच्या फाईव्ह स्टार हॉटेलसमोर टपरी टाकतो, त्यातून ‘दुल्हे राजा’ चित्रपटात मनोरंजनाचा मोठा धमका उडताना चित्रपटात दाखविला आहे. मात्र, मावळ तालुक्यात असाच प्रकार घडला असून त्यात हॉटेल चालकाने टपरीचालकावर तलवारीने वार करुन खुनाचा प्रयत्न (Pune Crime) केला आहे.

याप्रकरणी उमेश वसंत बालगुडे (वय ३२, रा. पाथरगाव, कामशेत, ता. मावळ) याने फिर्याद दिली आहे. त्यावरुन कामशेत पोलिसांनी (kamshet police) सत्येंद्रसिंह प्रेमसिंग चौहान ऊर्फ ठाकूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार मुंढावरे गावाच्या हद्दीत हॉटेल राधे राधे (Hotel Radhe Radhe) याच्या जागेच्या आत मध्यरात्री साडेबारा वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश बालगुडे याने हॉटेल राधे राधेचा चालक सत्येंद्रसिंह चौहान याच्या जागेत त्याच्या परवानगी नसताना टपरी लावली.
त्यामध्ये नाष्ट्याचे पदार्थ ठेवणार असल्याचा तसेच बालगुडे याच्या त्रासाला कंटाळून त्याचे कामगार काम सोडून निघून गेले.
या कारणावरुन सत्येंद्रसिंह याने राग मनात धरुन उमेश बालगुडे याच्याशी बाचाबाची करुन शिवीगाळ केली. सत्येंद्रसिंग याने त्याच्याकडील तलवारीने बालगुडे याच्या डोक्यात वार करुन डोक्यास गंभीर जखमा केल्या.
तलवारीने केलेल्या वारामुळे बालगुडे यांच्या कवटीचे हाड फॅक्चर केले. डाव्या हाताचा अंगठा कापून तोडला.

कामशेत पोलिसांनी (kamshet police) खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Story of ‘Dulhe Raja’ movie in Pune ! The hotel owner tried to kill pan shop owner with a sword

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Fisheries Business | मत्स्य पालन करून व्हा लखपती, दरमहिना होईल 2 लाखाची कमाई; व्याज फ्री लोन आणि इन्श्युरन्ससह अनेक सुविधा, जाणून घ्या

Gold Silver Price Today | लागोपाठच्या घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर, जाणून घ्या 10 ग्रॅमचे नवे दर

Best Investment Plan | ‘इथं’ तुम्हाला 1,000 रुपयांच्या बचतीवर मिळतील पूर्ण 18 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ सुरक्षित स्कीमबाबत सर्वकाही