Pune Crime | प्रेयसी आणि प्रियकराचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न; प्रेयसीचा मृत्यू, पुणे जिल्ह्यातील घटना
पुणे / शेलपिंपळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथे एका शेतात झाडाला गळफास घेऊन प्रेयसी आणि प्रियकराने आत्महत्या (Suicide) करण्याचा (Pune Crime) प्रयत्न केला. यामध्ये प्रेयसीचा जागीच मृत्यू (Died) झाला आहे. तसेच, प्रियकर हा बेशुद्ध झाला. याप्रकरणी पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा दिनकर सोनवणे (Sushma Dinkar Sonawane) (वय 22, रा. जांभोळशी, पो. मांढवे, ता. जुन्नर) या तरूणीचा मृत्यू झाला, तर तिचा प्रियकर हरिदास कुंडलिक देवचे (Haridas Kundlik Devche) (वय 28, रा. जांभोळशी) असं उपचार घेत असलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, ही घटना सोमवारी (20 डिसेंबर) रोजी घडली. सुषमा आणि हरिदास या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातील काही कारणावरून त्यांनी आत्महत्या (Suicide) केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सुषमा ही शिक्रापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती, तसेच, हरिदास हा चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत खासगी नोकरीस होता. आत्महत्येच्या प्रयत्नात सुषमा हिचा जागीच मृत्यू झाला, तर हरिदास हा बेशुद्ध अवस्थेत होता. दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतला होता. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक विनोद शेंडकर (PI Vinod Shendkar) यांनी दिली. (Pune Crime)
दरम्यान, सध्या प्रियकर हरिदासवर पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा व हरिदास या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातील काही कारणावरून त्यांनी आत्महत्या (Suicide) केल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे.
Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- NPS | पत्नीच्या नावाने आजच उघडा ‘हे’ स्पेशल अकाऊंट, दर महिना मिळतील 44,793 रुपये; जाणून घ्या पद्धत
- Chandrakant Patil | ‘उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर मुख्यमंत्रिपदाचा चार्ज…’ – चंद्रकांत पाटील
- Mumbai High Court | शारीरीक संबंधानंतर विवाहाला नकार देणे फसवणूक नाही; मुंबई उच्च न्यायालयाने तरूणाची केली सुटका