Pune Crime | छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; कोथरुड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेतजमीन व घर विकून स्वत:चे नावाने घर घेण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी सातत्याने होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास (Suicide in Pune) घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कोथरुडमधील (Kothrud) हनुमाननगरमधील केळेवाडी (Kelewadi, Hanumannagar) येथे बुधवारी दुपारी १२ वाजता घडला. (Pune Crime)

 

नंदिनी पवनकुमार बावदनकर (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी नंदिनी हिची बहिण पोर्णिमा रामेश्वर नालेगांवकर (वय २८, रा. औरंगाबाद) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद (Kothrud Police Station) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पवनकुमार रामदास बावदनकर, शोभा रामदास बावदनकर, रामदास बावदनकर, नंदिनीची नंणद मुक्ता व रोशनी व आजोबा गंगाराम सखाराम नालेगांवकर यांच्याविरुद्ध गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

नंदिनी हिचे पवनकुमार बावदनकर याच्याबरोबर ३० जानेवारी २०२० रोजी लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून आरोपींनी नंदिनी हिचे वडिलांचे शेतजमीन व घर विकून स्वत:चे नावे घर घेण्यासाठी तसेच दागिने सोडविण्यासाठी सतत पैशांची मागणी करुन क्रूर वागणूक दिली. मानसिक व शारीरीक छळ केला. या छळाला कंटाळून नंदिनी हिने १९ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता केळेवाडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Suicide by strangling a married woman; Incidents in the Kothrud area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Lata Mangeshkar | ‘स्वर कोकिळा लता मंगेशकर यांच्यासाठी प्रार्थना करा’; मंगेशकर कुटुंबीयांनी केलं आवाहन

 

SBI FD Interest Rates 2022 | फायद्याची गोष्ट ! SBI सह 3 बँकांच्या एफडीवर मिळणार जास्त व्याज

 

CM Uddhav Thackeray | जय महाराष्ट्र ! सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंचं नाव