Pune Crime | हडपसरमध्ये 2 मैत्रिणींची आत्महत्या; एकीने घेतला गळफास तर दुसरीने इमारतीवरुन मारली उडली

पुणे : Pune Crime | हडपसर येथील शेवाळवाडी (Shewalwadi, Hadapsar) येथील क्रिस्टल सोसायटीत (Cristal Society, Hadapsar, Pune) एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली तर दुसरीने त्याच इमारतीतील पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या (Suicide In Pune) केली. एकाच वेळी दोन तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. एकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना तिच्या मैत्रिणीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

सारिका हरिश्चंद्र भागवत Sarika Harishchandra Bhagwat (वय १९, रा. क्रिस्टल सोसायटी, शेवाळवाडी) आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड Akanksha Audumbar Gaikwad (वय १९ रा. मराठी शाळेसमोर, शेवाळवाडी) अशी या आत्महत्या केलेल्या दोन मैत्रिणींची नावे आहेत. हा प्रकार शेवाळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळील क्रिस्टल सोसायटीत मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Crime)

हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) दिलेल्या माहितीनुसार, सारिका आणि आकांक्षा या दोघी बाल मैत्रिणी होत्या. सारिका हिने आपल्या राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी पोहचले. सारिका हिची मैत्रिणी आकांक्षाही तेथे पोहचली. सारिका हिचा मृतदेह रुग्णावाहिकेतून घेऊन जाण्यात येणार होता. त्याचवेळी आकांक्षा ही त्याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर गेली. तेथून तिने खाली उडी मारली. ती सारिकाला नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिकेजवळच पडली. उंचीवरुन पडल्याने तिचा जागीच मृत्यु झाला. सारीका हिने का आत्महत्या केली व तिने आत्महत्या केल्याचे समजल्यावर आकांक्षा हिनेही आपला जीव संपविला, यामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप समजले नाही. हडपसर पोलीस (Hadapsar Police Station) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Shocking! Grandson killed grandmother in Warje Malwadi; find out

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

  धक्कादायक ! वारजे माळवाडीमध्ये नातीनं केला आजीचा खून; जाणून घ्या

Pune PMC-PMRDA | पीएमआरडीएनेच नाले, ओढ्यांवर बांधकाम परवानग्या दिल्याने; समाविष्ट गावांमध्ये ‘पूरस्थिती’ची परिस्थिती ! ; महापालिकेच्या पत्रानंतरही पीएमआरडीए कडून दोन वर्षात कुठलिच कारवाई नाही