Pune Crime | ‘सुकांता’ची थाळी पडली दीड लाखांना; जाहिरात पाहून ऑनलाईन मागविण्याचा प्रयत्नात झाली फसवणूक

पुणे : Pune Crime | फेसबुकवर (Facebook) ‘सुकांता’ थाळीची जाहिरात (Sukanta Thali Advertisement) पाहून ऑनलाईन ऑर्डर (Online Order) करण्याचा प्रयत्न एका महिलेच्या चांगलाच अंगलट आला. सायबर चोरट्यांनी (Cyber Crime) त्यांच्या खात्यातून १ लाख ५२ हजार ३२१ रुपये काढून घेऊन फसवणूक (Fraud Case) केली. (Pune Crime)

याप्रकरणी कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील ३९ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद (गु. रजि. नं. १०१/२२) दिली आहे. हा प्रकार २७ ऑगस्ट रोजी घडला होता. फिर्यादी यांच्या पत्नीने फेसबुकवर सुकांता थाळीची जाहिरात पाहून त्यावरील मोबाईलवर संपर्क साधला. तेव्हा सायबर चोरट्याने त्यांना एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. (Pune Crime)

त्यामध्ये त्याने क्रेडिट कार्डची (Credit Card) माहिती भरण्यास सांगितले.
त्यानुसार त्यांनी कार्डची माहिती भरल्यावर त्यांच्या मोबाईलचा अ‍ॅक्सेस सायबर चोरट्याने घेऊन त्यांच्या
खात्यातून १ लाख ५२ हजार ३२१ रुपये काढून घेऊन त्यांची फसवणूक (Cheating Case) केली.
त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक भुजबळ
(Police Inspector Bhujbal) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | Sukanta’s plate fell to one and a half lakhs; After seeing the ad, I got scammed while trying to order online

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Beed ACB Trap | 7000 हजार रुपये लाच घेताना तलाठी आणि खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

LIC Policy Rules | एलआयसी पॉलिसीचे हे काम लवकर करा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान, बदलले नियम; जाणून घ्या

Arthritis | यूरिक अ‍ॅसिड असे करा कंट्रोल, ‘या’ 5 उपायांनी होऊ शकते सांधेदुखीपासून सुटका