Pune Crime | नोबेल हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणार्‍या गुन्हेगार सनी हिवाळेच्या साथीदारांवर गुन्हा दाखल, तिघा सराईतांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मोक्कातून सुटून (MCOCA Act) Mokka आलेल्या गुन्हेगार सनी हिवाळे (Sunny alias Girish Hiwale) याच्यावर त्याच्याविरोधी टोळीने प्राणघातक हल्ला केल्यानंतर त्याला नोबेल हॉस्पिटलमध्ये (Noble Hospital Pune) उपचारासाठी आणले होते. यावेळी त्याच्या समर्थकांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) गुन्हा दाखल केला आहे.

 

याप्रकरणी तिघा सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. अनिकेत राजू वायदंडे Aniket Raju Vaidande (वय २३, रा. काळेपडळ, हडपसर), साजित झिब्राईल नदाफ Sajit Jibril Nadaf (वय २२, रा. हडपसर) आणि अनिकेत शरद माने Aniket Sharad Mane (वय २२, रा. हडपसर) अशी अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची (Pune Criminals) नावे आहेत. त्यांचे साथीदार चेतन ढेबे (Chetan Dhebe) , नितीन सोनवणे (Nitina Sonavane), सागर ओव्हाळ (Sagar Ovhal) व त्यांच्या इतर ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

काळेपडळ येथे मंगळवारी रात्री राहुल कोळी व त्याच्या साथीदारांनी सनी हिवाळे व सोहेल यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.
जखमी अवस्थेत रात्री त्यांना नोबेल हॉस्पिटल येथे आणण्यात आले होते. (Pune Crime)

 

ही बाब समजताच त्याचे ३० ते ४० साथीदार जमा झाले.
त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून रुग्णालय परिसरात गोंधळ घालून सह पोलीस आयुक्तांचा जमाव बंदीचा आदेश धुडकावून लावल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Sunny Hiwale accomplices charged in riot at Nobel Hospital three inmates arrested

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा