Pune Crime | दोन मुलांच्या भांडणात महिलेचा विनयभंग, सराईत गुन्हेगार सुरज उर्फ सोन्या कुडले आणि नितीन कदम यांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | जुन्या भांडणातून (Dispute) सराईत गुन्हेगार (Criminals) आणि त्याच्या साथिदारांनी महिलेला अश्लील शिवीगाळ (Obscene Swearing) करुन विनयभंग (Molestation Case) केला. हा प्रकार कोथरुड परिसरात (Kothrud Area) गुरुवारी (दि. 31 मार्च) रात्री साडे अकराच्या सुमारास (Pune Crime) घडला. पोलिसांनी (Pune Police) एका सराईत गुन्हेगारासह 4 जणांवर गुन्हा (FIR) दाखल करुन दोघांना अटक (Arrest) केली आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याबाबत कोथरुड परिसरात राहणाऱ्या 22 वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुरज उर्फ सोन्या कुडले (वय-31 रा. भुगांव मुळशी, पुणे), मनोज कुडले (वय-25 रा. चांदणी चौक, कोथरुड), नितीन प्रकाश कदम (वय-25 रा. वारजे) त्यांचा एक साथिदार यांच्यवर गुन्हा दाखल करुन सुरज उर्फ सोन्या कुडले आणि नितीन कदम यांना अटक केली आहे. सुरज कुडले (Pune Criminals) हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा लहान भाऊ आणि सुरज कुडले यांच्यात पूर्वी वाद झाले होते.
याचा राग मनात धरुन आरोपी आपल्या साथिदारांसह हात कोयते घेऊन महिलेच्या घरी आला.
त्याने घराच्या दरावर लाथा मारुन अश्लील शिवीगाळ केली.
तसेच पीडित महिलेचा हात पकडून तिला ढकलून देत मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Suraj alias Sonya Kudle and Nitin Kadam arrested for molesting a woman in a quarrel between two children

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | गुलटेकडी परिसरात किरकोळ कारणावरुन 2 महिलांमध्ये ‘राडा’, दोघांना अटक

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यात वाढ

 

Punit Balan Group | तिसरी ‘एस. बालन T-20 लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! पुनित बालन ग्रुप संघाचा विजयाचा चौकार; अर्थव काळेची नाबाद शतकी खेळी