Pune Crime | 26 वर्षीय पत्नीच्या चारित्र्यावर संशय, 29 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर पतीनं केलं भलतच कृत्य, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | चारित्र्याचा संशय (Doubt On Wife Character) घेऊन पतीने (Husband) पत्नीचे डोके भिंतीवर आपटून तोंडावर उशी दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला (Attempt To Kill). याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police Station) 29 वर्षीय सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) पतीला अटक केली आहे. याबाबत २६ वर्षाच्या महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ६८/२२) दिली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता घडला. (Pune Crime)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा सिव्हिल इंजिनिअरचा पदविका धारक आहे. तो एका बांधकाम साईटवर गंवडी म्हणून काम करीत आहे. आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर त्यांच्यात काल दुपारी भांडणे झाली होती. तेव्हा त्याने फिर्यादीला शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आपटून खाली पाडले (Crime Against Woman) . तिच्या छातीवर बसून उशीने तिचे नाक तोंडावर जोरात दाबून धरले. त्यामुळे तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिची शुद्ध हरपली.
त्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याने हा प्रकार घरच्यांना किंवा पोलिसांना सांगितला तर जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली (Pune Crime). रुग्णालयाने या घटनेची माहिती उत्तमनगर पोलीस ठाण्यास दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी रुग्णालयाला भेट देऊन या महिलेची चौकशी केली. तेव्हा तिने खरा प्रकार सांगितला. सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | Suspicion on the character of 26-year-old wife, 29-year-old civil engineer husband did a bad deed, find out the case
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर
लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त