Pune Crime | सुझुकी ईको गाड्यांचे सायलेंन्सर चोरणाऱ्या दोघांकडून आणखी गुन्हे उघडकीस, एकूण 14 गुन्हे उघड; लोणीकाळभोर पोलिसांची कारवाई

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लोणी काळभोर (Loni Kalbhor) आणि परिसरातून चारचाकी गाड्यांचे (Four-Wheeler) सायलेंन्सर चोरणाऱ्या (Silencer Thieves) दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी (Pune Police) 16 एप्रिल रोजी सापळा रचून अटक (Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मारुती सुझुकी ईको (Maruti Suzuki Eeco) गाडीचे चोरलेले सायलेन्सरसह 3 लाख 60 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. ही कारवाई उरळी देवाची (Uruli Devachi) येथे करण्यात आली असून शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे (Shivprasad Pandharinath Rokade), राम राजेश ढोले (Ram Rajesh Dhole) या दोघांना अटक (Pune Crime) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एकूण 14 गुन्हे उघडकीस आले आहेत.

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) चारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपींचा शोध घेण्यात येत होता. दरम्यान तपास पथकातील (Investigation Team) पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की, सायलेन्सर चोरणारे चोरटे उरुळी देवाची गावच्या हद्दीत येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून शिवप्रसाद रोकडे (वय-21 रा. गोपाळपुरा, आळंदी-Alandi, ता. खेड) आणि राम ढोले (वय-20 रा. आळंदी ता. खेड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता 5 गुन्हे उघडकीस आले होते. (Pune Crime)

आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची 10 दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली होती. पोलीस कोठडीत आरोपींकडे सखोल चौकशी केली असता आरोपींनी पुणे शहर आणि पुणे जिल्हा हद्दीत आणखी सायलेन्सर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींनी विमातळ (Vimantal Police Station), येरवडा (Yerawada Police Station), सासवड (Saswad Police Station), हडपसर (Hadapsar Police Station), कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Stations) हद्दीत सायलेन्सर चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले. पोलिसांनी यापूर्वी 5 आणि त्यानंतर 9 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलिसांनी आरोपींकडे असलेल्या स्विफ्ट कार व चोरलेले 14 सायलेन्सर, सायलेन्सर कॅथॉलिक कनव्हर्टर मधील धातु मिश्रित चुरा आरोपी शहाबाज खान (Shahbaz Khan) याला विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस आरोपी शहाबाज खान याचा शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi),
पोलीस निरीक्षक गुन्हे सुभाष काळे (Police Inspector Subhash Kale)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक राजु महानोर (API Raju Mahanor) पोलीस हवालदार नितीन गायकवाड, संतोष होले, पोलीस नाईक सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिगंबर साळुंखे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Suzuki Eco car silencer theft case uncovered by two, a total of 14 crimes uncovered; Lonikalbhor police action

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

शारीरीक संबंधाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी;
घरी, वेगवेगळ्या हॉटेल रुममध्ये आणि कारमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार

 

Navneet Ravi Rana Sent To Judicial Custody | राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ !
कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, जामीन अर्जावरील सुनावणीही लांबणीवर

 

 घरात घुसून 18 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग, हडपसरच्या फुरसुंगी परिसरातील घटना

 

Pune Crime | इन्स्टाग्रामवर बनला मित्र, 20 वर्षाच्या तरुणीला कोल्ड्रींग मधून गुंगीचे औषध देऊन दाखवलं ‘काम’,
बलात्कार प्रकरणी FI