Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात कुरिअरने आल्या तलवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | औरंगाबाद शहरामध्ये (Aurangabad City) एकाचवेळी कुरियरने (Courier) आलेल्या तब्बल 37 तलवारी (Sword) पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जप्त केल्या. त्यानंतर आता असाच प्रकार पुण्यात उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. कुरियरने कोणतीही वस्तू मागवता येत मात्र पुण्यातील (Pune Crime) काही महाभागांनी तलवारीच मागवल्या आणि कुरियर कंपनीने त्या पाठवल्या. हा प्रकार शुक्रवारी (दि.31) सायंकाळी उघडकीस आला आहे. शुक्रवारी दुपारी नियंत्रण कक्षाला (Pune City Police Control Room) मार्केटयार्ड (Market Yard) येथील DTDC कुरिअर द्वारे (DTDC Courier Market Yard Pune) तलवारी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्याचे (Swargate Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर (Senior Police Inspector Ashok Indalkar) यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. पोलिसांनी मार्केटयार्ड येथील कुरियर कंपनीच्या कार्यालयाची तपासणी केली असता पोलिसांना पार्सलमध्ये दोन धारदार तलवारी सापडल्या.

औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात तलवारी सापडल्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) कुरियरमध्ये अशा संशयास्पद पद्धतीने तस्करी (Smuggling) केली जात असल्यास पोलिसांना याची माहिती द्यावी असे आवाहन कुरियर कंपन्यांना केले होते.
त्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा (Crime) उघडकीस आला आहे. स्वारगेट पोलिसांनी तलवारी जप्त (Sword Seize) केल्या आहे.
या तलवारी पंजाब (Punjab) येथील लुधियाना (Ludhiana) येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
ज्या नावाने या तलवारी मागवण्यात आल्या आहेत त्यांच्याकडे पोलीस चौकशी (Inquiry) करत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक येवले (PSI Ashok Yewale) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | swards delivered through DTDC Courier Market Yard in Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kirit Somaiya | मंत्री हसन मुश्रीफ किरीट सोमय्यांच्या रडारवर; पुणे न्यायालयात याचिका दाखल

 

Pune Crime | पुणे महापालिकेला हस्तांतरित केलेली जागा भाड्याने देऊन 38 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा

 

Pune Crime | धक्कादायक ! विमाननगर परिसरातील बॅकस्टेज पबमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, 19 वर्षाच्या मुलावर FIR