Pune Crime | तडीपार आरोपीने पोलिसांना कोयत्याचा धाक दाखवून केली धक्काबुक्की

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तडीपार आदेशाचे (Tadipar Order) उल्लंघन करुन शहरात वावरणाऱ्या सराईत गुन्हेगाराने (Criminals in Pune) पोलिसांना कोयत्याचा धाक दाखवून धक्काबुक्की केल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे रविवारी (दि.30) पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली आहे. सांगवी पोलिसांनी (Sangvi Police) आरोपीला अटक केली आहे.

 

सलीम पापा शेख Salim Papa Sheikh (वय-36 रा. फ्लॅट नं.8, अशोका पार्क सोसायटी, काटे पेट्रोल पंपासमोर, पिंपळे सौदागर) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस नाईक श्याम रमणलाल साळुंके Shyam Ramanlal Salunke (वय-35) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सलीम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याला पिंपरी-चिंचवड शहर (Pimpri-Chinchwad City), पुणे शहर (Pune City) व पुणे जिल्ह्यातून (Pune District) दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. परंतु त्या आदेशाचे उल्लंघन करुन पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता तो पिंपळे सौदागर परिसरात वावरत होता. (Pune Crime)

याबाबत माहिती मिळाल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस कारवाई करण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी साळुंके यांना धक्का मारुन निघून जाऊ लागला. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने त्याला अटकाव केला असता आरोपीने कमरेला खोचलेला कोयता बाहेर काढून पोलिसांना धमकावून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळू गवारी (PSI Kalu Gawari) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Tadipar accuse misbehave with pimpri chinchwad police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा