Pune Crime | तडीपारी संपलेल्या गुन्हेगाराने ५५ वर्षाच्या आईला केली मारहाण; शनिवार पेठेतील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | आईला माऊलीपासून अनेक उपमा दिल्या जातात. मात्र, याच आईवर आता छोट्या छोट्या कारणावरुन हात उचलण्याचे धक्कादायक प्रकार समोर येऊ लागले आहेत. कबतुर घरात का घेऊन आला असे विचारल्याने एका तडीपारी संपल्याने घरी आलेल्या गुन्हेगाराने आपल्या ५५ वर्षाच्या आईला उलथण्याने व झाडूने मारहाण केली. सासूला सोडविण्यासाठी आलेल्या सुनेलाही त्याने मारहाण केली. (Pune Crime)

याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambaug Police Station) जय राजेश भोसले Jay Rajesh Bhosale (रा. साई कॉम्प्लेक्स, शनिवार पेठ) याला अटक केली आहे. याबाबत त्याची आई उर्मिला राजेश भोसले (वय ५५) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेअकरा वाजता राहत्या घरात घडली. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय भोसले याला फरासखाना पोलिसांनी तडीपार केले होते. सुमारे १५ दिवसांपूर्वी त्याची तडीपारीची मुदत संपल्याने तो शनिवार पेठेतील घरी येऊन राहु लागला. जय भोसले हा रविवारी सकाळी कबुतर घरात घेऊन आला होता. तेव्हा कबुतर घाण करतात, त्याला घरी का आणले असे त्याच्या आईने त्याला विचारले. त्यावरुन त्याने आईबरोबर वाद घातला. वाद वाढल्याने त्याने आपल्या आईला स्वयंपाक घरातील उलथण्याने मारले. तसेच घरातील झाडु घेऊन त्याने मारहाण करुन लागला. हे पाहून जय याची पत्नी आपल्या सासूला सोडविण्यासाठी मध्ये पडली. तेव्हा त्याने तिलाही हाताने मारहाण केली. आपल्याच मुलाने आपल्यावर हात उचलल्याने शेवटी आईने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला अटक केली असून हवालदार गणेश भुजबळ अधिक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | Tadipar Criminal beat his mother incident of shaniwar peth area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’