क्राईम स्टोरीपुणे

Pune Crime | तडीपार गुंडांनी चायनीज स्टॉल चालकाला धमकावून उकळली खंडणी; पुण्याच्या विमाननगर परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | तडीपार असताना आपल्या साथीदारामार्फत चायनीज स्टॉलचालकाला (chinese food stall in pune) धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसुल (extortion case in pune) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) दोघा गुंडांवर खंडणीचा गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

शकील शब्बीर शेख (वय २३) आणि समीर शब्बीर शेख (वय २७, दोघे रा. लोहगाव – Lohegaon) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत टिंगरेनगर (Tingrenagar) येथील एका २७ वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकील आणि समीर शेख हे सराईत गुन्हेगार असून त्यांना येरवडा पोलिसांनी ऑगस्ट २०१९ मध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्यांनी एका महिलेला धमकावून तिच्याकडील सोन्याचा नेकलेस जबरदस्तीने चोरुन नेला. त्यांच्याकडून ५ चोरीच्या दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या होत्या. त्यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ यांनी तडीपार केले होते.
फिर्यादी हे विमाननगरमधील गणपती चौकात (Ganpati Chowk, Vimannagar) चायनीजची गाडी लावतात.

फिर्यादी व त्यांचे कामगार चायनीज स्टॉलवर असताना ७ जानेवारी रोजी रात्री आठ वाजता शकील शेख तेथे (Pune Crime) आला.
त्याने फिर्यादी यांना “आपको समीर भाईने बोला था ना चायनीज का स्टॉल चलाने का है तो महिने का दस हजार रुपये देना पडेगा ये ले समीर भाई से बात कर” असे म्हणून फोन लावून फिर्यादीकडे दिला.
त्यावर समीर शेख याने “तुला स्टॉल चालवायचा असेल तर महिना १० हजार रुपये द्यावे लागेल,” अशी धमकी दिली.
त्यावर फिर्यादी यांनी घाबरुन शकील शेख याला १२०० रुपये काढून दिले.
तेव्हा त्याने दर महिन्याला पैसे दिले नाही तर स्टॉल चालवू देणार नाही, अशी धमकी दिली.
या प्रकाराने घाबरुन फिर्यादी यांनी आजवर तक्रार दिली नव्हती.
पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :-  Pune Crime | Tadipar goons threaten Chinese stall driver Incidents in Vimannagar area of ​​Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

 

Back to top button