Pune Crime | तडीपार गुंडाची पोलिसांना धक्काबुक्की, धमकी देत म्हणाला – ‘तुम्हाला बघून घेतो’

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | पुणे शहर, पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले असतानाही भोसरी (Bhosari) येथील घरी येऊन राहत असलेल्या तडीपार गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली़ तसेच तुमच्याकडे बघून घेतो, अशी धमकी देण्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

भोसरी एमआयडीसी पोलिसांनी (Bhosari MIDC Police) सत्यशील सिद्धार्थ इंगोले (वय २७, रा. बालाजीनगर, भोसरी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक गणेश महाडिक यांनी फिर्याद दिली आहे.

सत्यशील इंगोले याला पिंपरी चिंचवड, पुणे शहर व पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. असे असताना तो तडीपारीच्या आदेशाचा भंग करुन घरी येऊन रहात असल्याची माहिती भोसरी एमआयडीसी पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पोलीस रविवारी सायंकाळी साडेचार वाजता त्याला पकडण्यासाठी बालाजीनगर झोपडपट्टीतील (Balajinagar, Pune) त्याच्या घरी गेले.
तेव्हा तो घरातच मिळून आला़ त्याला ताब्यात घेत असताना त्याने फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली.
तसेच त्याला पकडल्यानंतर त्याने तुमच्याकडे बघुन घेतो, अशी धमकी दिली.

 

Web Title : Pune Crime | Tadipar thug threatens police, says – ‘I’ll see you’

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

T20 World Cup 2021 | ‘टी’ 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ निश्चित, जाणुन घ्या 15 सदस्यांची नावे

High BP | उच्च रक्तदाबाची सर्वसामान्य दिसणारी ‘ही’ लक्षणे तुम्हाला माहीत आहेत?, जाणुन घ्या

Relationship | पत्नीने पतीला दिली ‘छोटा पाहुणा’ येणार असल्याची खुशखबर, 2 वर्षापूर्वी नसबंदी केलेल्या पतीची उडाली झोप!