Pune Crime | पुण्यात कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी करुन खंडणी मागणारे बाप-लेक गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बांधकाम साईटवर आरएमसी टाकण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला दमदाटी करुन 45 हजाराची खंडणी (Pune Crime) घेतल्याचा प्रकार दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे. बांधकाम साइटवर काँक्रिटचे काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून तीस हजार रुपयांची खंडणी (Extortion Case) घेऊन फोन करुन एक लाख रुपये खंडणी मागितली. याप्रकरणी दिघी पोलिसांनी (Dighi Police Station) तिघा बापलेकांना बेड्या (three arrest) ठोकल्या आहेत. हा प्रकार मागील पाच महिन्यापासून 10 सप्टेंबर या कालावधीत काळजेवाडी चऱ्होली बुद्रुक येथील आवनी आवास या बांधकाम साईटवर घडला.

सत्यवान ज्ञानेश्वर तापकीर (वय-46), आकाश सत्यवान तापकीर (वय-25), सागर सत्यवान तापकीर (वय-23 तिघे रा. काळजेवाडी, चऱ्होली, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या बापलेकांची नावे आहेत. याप्रकरणी मनोज नरेश गुप्ता Manoj Naresh Gupta (वय-44 रा. निगडी प्राधिकरण, पुणे) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्ता यांची काळजेवाडी येथे आवनी आवास नावाची बांधकाम साईट सुरु आहे. या ठिकाणी आरएमसी कॉन्ट्रॅक्टर (RMC Contractor) चव्हाण आरएमसी मटेरियल पुरवतात. गुप्ता यांच्या साईटवर मटेरियल टाकण्यासाठी आरोपींनी चव्हाण यांना दमदाटी करुन 50 हजार रुपयाची खंडणी (Ransom) मागून 45 हजार रुपये घेतले.

तसेच बांधकाम साईटवर हरीश पटेल (Harish Patel) हे काँक्रिटचे काम करतात.
आरोपी आकाश याने त्यांना धमकावून 30 हजार रुपयाची खंडणी घेतली.
10 सप्टेंबर रोजी आरोपी सत्यवान याने पटेल यांना फोन करुन एक लाख रुपयाची खंडणी मागितली.
पैसे दिले नाही तर गाड्यांची तोडफोड करुन साईटवर येऊ देणार नाही, अशी धमकी दिली.
याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.

Web Titel :- Pune Crime | tapkir father and son arrested, who demanded ransom by forcing the contractor

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PM Kisan Yojana | पुढील हप्त्यासोबत मिळवू शकता अडकलेला मागील हप्ता, जाणून घ्या कसा

Nagpur Police | पुण्यात प्रशिक्षणासाठी गेलेल्या नागपूरच्या 12 पोलिसांना कोरोनाची लागण, पोलीस दलात खळबळ

Rajesh Tope | राज्यातील मंदिरं कधी उघडणार ? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी देले ‘हे’ संकेत