Pune Crime | पिंपरीतील संतापजनक घटना ! शिक्षकाकडून नात्यातील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पिंपरी चिंचवड परिसरातील (Pimpri Chinchwad) एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse Of A Minor Girl) केल्याची संतापजनक घटना (Pune Crime) समोर आली आहे. नराधम शिक्षक असलेल्या तरुणाने हे कृत्य केलं असल्याचं समोर आलं आहे. पीडित मुलीला फटके देण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली. या प्रकरणी नराधम शिक्षकावर गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. (Pune Crime | Sexual abuse of a minor girl in a relationship by a teacher in pimpri chinchwad)

 

याबाबत माहिती अशी की, आरोपी हा खासगी शिकवणी वर्ग घेतो. खरंतर आरोपी हा पीडितेचा आते भाऊ आहे. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला घरात बोलावले. त्यानंतर 25 फटके मारीन अशी धमकी देऊन अश्लिल कृत्य केले. या घटनेमुळे पीडिता घाबरली. त्यानंतर तिने हा सर्व प्रकार आपल्या आई – वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. (Pune Crime)

 

दरम्यान, याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात (Chakan Police Station) संबंधित शिक्षकाविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | teacher sexually abuses minor girl in pimpri chinchvad

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा