Pune Crime | गांजा तस्करी गुन्ह्यातील आरोपीचा जामीन दुसर्‍यांदा फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गांजा तस्करी गुन्ह्यामधील (Pune Crime) आरोपीने जामिनावर मुक्त होण्यासाठी दुसऱ्यांदा जामीन अर्ज दाखल केला. मात्र विशेष न्यायाधीश (एनडीपीएस-NDPS) ए. एन. मरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला (Bail Application Rejected).

आंध्र प्रदेशमधून पुण्यात वाहनामधून गांजा आणताना नार्कोटिक्स सेल अधिकाऱ्यांनी छापा मारून आरोपींना पकडले होते. या छाप्यामध्ये एकूण 868 किलो वाणिज्यक प्रमाणाचा गांजा जप्त करण्यात आला.
जब्बार मुल्ला असे जामीन फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे.
जून 2020 मध्ये पुण्यातील कस्टम्स नार्कोटिक्स सेल विभागास आंध्रप्रदेशमधून पुण्यात आलेल्या वाहनामध्ये गांजा असल्याची गुप्त माहिती मिळाली.
या वाहनांवर लक्ष्य ठेवून नार्कोटिक्स सेल अधिकाऱ्यांनी छापा मारून आरोपींना पकडले.
त्यांना न्यायालयासमोर हजर करून येरवडा कारागृहात त्यांची रवानगी केली.
या गुन्हयामधील एक आरोपी जब्बार मुल्ला याने दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला.
नार्कोटिक्स सेल कस्टम खात्याच्या वतीने विशेष सरकारी वकील संदीप घाटे (Adv. Sandeep Ghate) यांनी आरोपीच्या जामिनाला विरोध केला.
मात्र आरोपीच्या वकिलांनी त्याने हा गुन्हा केला नसून, त्याचा गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचा युक्तिवाद केला.

यावर ॲड घाटे यांनी हरकत घेऊन प्रचलित सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यांचे दाखले दिले
व दोषारोपत्र दाखल असले तरी अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्हयामध्ये आरोपीस जामिनावर मुक्त करता येत नाही असा युक्तिवाद केला.
ॲड. घाटे यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.
आरोपी जब्बार मुल्ला (Jabbar Mulla) हा अमली पदार्थ जगतातील संघटित गुन्हेगारांना आश्रय व आर्थिक रसद पुरवण्याचे बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच आरोपीचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून,
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणारे असल्याचे न्यायाधीशांनी निकालपत्रात नमूद केले आहे.
अधीक्षक मदन देशमुख (SP Madan Deshmukh) व कस्टम वरिष्ठ निरीक्षक अमजद शेख (Senior Inspector Amjad Shaikh) यांनी आरोपीस मुद्देमालासह जेरबंद केले.

Web Titel :- Pune Crime | The accused in the cannabis smuggling case was denied bail for the second time

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | नगरमध्ये आ. रोहित पवारांचा भाजपला दुसरा धक्का; ‘हा’ बडा कार्यकर्ता राष्ट्रवादीत

Sanjay Raut | संजय राऊत काय पिऊन बोलतात कळत नाही, नारायण राणेंचा घणाघात

Punjab Politics | कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर आता ‘ही’ नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत