Pune Crime | कारागृहातून सुटलेल्या आरोपीने कारागृहातील महिला रक्षकालाच घातला गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फसवणुकीच्या गुन्ह्यात (Offense of Fraud) कारागृहातून शिक्षा भोगून आल्यानंतर आरोपीने थेट कारागृहातील महिला रक्षकाला (Female Prison Guard) दहा हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या (Senior Officers) कार्यालयातील लिपिक (Office Clerk) बोलत असल्याची बतावणी महिला रक्षाकाकडे केली. त्यांना बदली (Transfer) करण्याची धमकी देऊन बदली न करण्यासाठी त्यांच्याकडून ऑनलाइन दहा हजार रुपये घेतले. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी (Pune Police) आरोपीला अटक (Pune Crime) केली आहे.

 

अमित जगन्नाथ कांबळे Amit Jagannath Kamble (वय-35) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत कारागृहातील महिला रक्षकाने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अमित कांबळे याच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात तो येरवडा कारागृहात (Yerwada Jail) शिक्षा भोगत होता. त्याची नुकतीच सुटका झाली असून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्याने महिला रक्षकाच्या मोबाईलवर संपर्क साधला. अमितने महिला रक्षकाला आपण कारागृह विभागाचे (Jail Department Head) प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक (Addl DGP) यांच्या कार्यालयातून लिपीक इंगळे बोलत असल्याचे सांगितले. त्याने सांगितले की, तुमची बदली करण्यात येत आहे. तुम्ही ज्या ठिकाणी कार्यरत आहात, तेथून पाच ते सहा तक्रारी प्राप्त झाल्याचे त्याने सांगितले.

तुमची बदली मी थांबवू शकतो यासाठी लगेच दहा हजार रुपये ऑनलाइन पाठवा, असे सांगितले.
यामुळे घाबरलेल्या फिर्यादी यांनी लगेच दहा हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले.
यानंतर फिर्यादी यांनी कारागृह प्रशासन कार्यालयाकडे यासंदर्भात चौकशी केली त्यावेळी त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी लगेच येरवडा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.
येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वारंगुळे (PSI Warangule) आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरु केला.
आरोपी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली.
पथकाने सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

 

अमित कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याने वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेत्यांचे हुबेहुब आवाज काढून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
तपासादरम्यान आरोपीने कारागृहातील आणखी चार ते पाच जणांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
त्याने कारागृहातील रक्षकांचे मोबाईल क्रमांक कोठून मिळवले, याचा तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title : –  Pune Crime | The accused released from the jail raped the female guard of the jail

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा