Pune Crime | लोहगाव परिसरात गोळीबार करणाऱ्या टोळीला विमानतळ पोलिसांनी 6 तासात केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दहशत माजवण्यासाठी टोळक्याने लोहगाव भागात गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.25) रात्री घडली. टोळक्याने हवेत तीन गोळ्या झाडल्या. यानंतर पसार झालेल्या आरोपींना विमानतळ पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे. अटक करण्यात (Pune Crime) आलेल्या आरोपींकडून 50 हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे.

नितीन किसन सकट (वय-21), गणेश सखाराम राखपसरे (वय-21), पवन युवराज पैठणकर (वय-19), अविनाश काळुराम मदगे (वय-22 तिघे रा. राखपसरे वस्ती, लोहगाव), अविनाश काळुराम मदगे (वय-22 रा. खेसे पार्क, लोहगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime)

सार्वजनिक रोडवर गोळीबार करुन फरार झालेल्या आरोपींचा विमानतळ पोलीस ठाण्यातील तपास पथकाकडून शोध घेतला जात होता. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल योगेश थोपटे व गिरीष नाणेकर यांना नितीन सकट हा त्याच्या साथीदारांसह लोहगाव येथील खंडोबा माळ डोंगरात लपुन बसला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वेगवेगळी पथके तयार करुन पोलिसांनी आरोपींना सापळा रचून अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले पिस्टल जप्त केले आहे.

ही करावाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
अपर पोलीस आयुक्त (पुर्व) नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ-4 शशिकांत बोराटे,
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे,
पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र ढावरे, पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे,
सचिन कदम, सचिन जाधव, उमेश धेंडे, गिरिष नाणेकर, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, रुपेश तोडेकर, योगेश थोपटे,
संजय आसवले यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Pune Crime | The airport police arrested the gang that fired in Lohgaon area within 6 hours

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Metro | शिवाजीनगर – हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या माहितीसाठी संकेतस्थळ विकसित

Vikram Gokhale Death | पुण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने सांगितली विक्रम गोखलेंबद्दलची आठवण; तीन महिन्यापूर्वी पोलिस स्टेशन मध्ये झाली होती भेट

Akola Crime | ‘मला सासु-सासऱ्यांनी मारहाण केलीय, मी आता…’, पोलिसांच्या 112 नंबरवर फोन करुन तरुणानं उचललं टोकाचं पाऊल