Pune Crime | DSK यांच्या बंगल्यात चोरी करणाऱ्याचा जामीन फेटाळला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) बांधकाम व्यावसायिक दीपक कुलकर्णी Deepak Kulkarni (DSK) यांच्या बंगल्यात चोरी (Theft) झाली होती. चोरीच्या प्रकरणात एका आरोपीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला (Bail application rejected) आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.व्ही. निमसे (Magistrate S.V. Nimse) यांनी हा आदेश दिला आहे. डीएसके सध्या 26 ठेवीदारांची फसवणूक (Pune Crime) केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत (Judicial custody) आहेत.

सुरेश संकर धोत्रे (वय-43 रा. दीप बंगला चौक) असे आरोपीचे नाव आहे. तर सूरज उर्फ चिपाली, फॅन्ड्री, लाला, विशाल विटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. याबाबत भाग्यश्री अमित कुलकर्णी Bhagyashree Amit Kulkarni (वय-37 रा. गणेशखिंड रस्ता, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi police station) फिर्याद दिली आहे. ऑक्टोबर 2019 ते ऑक्टोबर 2021 दरम्यान ही चोरी (Pune Crime) झाली होती.

या चोरीच्या घटनेमध्ये टीव्ही, म्युझिक सिस्टिम, प्रोजेक्टर, पिठाची गिरणी, एसी, गिझर असा एकूण 6 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता, असे फिर्यादीत नमूद केले आहे. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. आरोपीने केलेल्या अर्जाला सरकारी वकील विशाल मुरळीकर (Public Prosecutor Vishal Muralikar) यांनी विरोध केला होता.

अटक करण्यात आलेला आरोपी हा सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर चोरी, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घ्यायचा असून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करायचा आहे.
आरोपीला जामीन दिल्यास तो पुढील तपासणीसाठी हजर राहण्याची शाश्वती नाही.
त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 14 वर्षाच्या मुलीचा खून झाल्यानंतर कुटुंबियांनी गृहमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

18 Carat Gold | 18 कॅरेट सोन्यात केवळ 75% असते शुद्धता, जाणून घ्या कोणते असते सर्वाधिक चांगले आणि खरेदीच्यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Crime | The burglar’s bail at DSK’s bungalow was denied

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update