Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या चंदननगर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गणपती मंदिराच्या मोकळ्या जागेच्या कारणावरुन टोळक्याने एकावर धारदार हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला होता. हा प्रकार (Pune Crime) 12 डिसेंबर रोजी बिडीकामगार वसाहत चंदननगर (Chandannagar) येथे घडला होता. या गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी (Pune Police) गुन्हा घडल्यानंतर चार तासात अटक (Arrest) केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या फरार साथीदाराला चंदननगर पोलिसांनी (Chandannagar Police Station) श्रीगोंदा तालुक्यातून अटक केली आहे.

 

ओमकार भांडारी (रा. केनंद) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ईर्शाद बागमार (वय-29 रा. बिडीकामगार वसाहत, चंदननगर), सुफीयान जाकीर तांबोळी (वय-22 रा. केसनंद, वाघोली), हुसेन अब्दुल शेख (वय-23 रा. बोराटेवस्ती, चंदननगर), अनिकेत शिंदे (वय-27 रा. चंदननगर) यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर त्यांचा फरार साथीदार शाहरुख चांद शेख (वय-27 रा. बिडीकामगार वसाहत, चंदननगर) याला शनिवारी (दि.24) अटक केली आहे. (Pune Crime)

 

बिडीकामगार वसाहत येथील गणपती मंदिराच्या मोकळ्या जागेच्या कारणावरून आरोपींनी ओमकार भांडारी याच्यावर धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी करुन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन चार जणांना अटक केली होती. तर शाहरुख हा फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नामदेव गडदरे व सुभाष आव्हाड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करुन तसेच पोलीस अमंलदार अविनाश संकपाळ व महेश नाणेकर यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शाहरुख शेख याला श्रीगोंदा तालुक्यातील (Srigonda Taluka) घोगरगाव येथून अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishore Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior Police Inspector Rajendra Landge),
पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (Police Inspector Jagannath Jankar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, पोलीस अंमलदार अविनाश संकपाळ,
महेश नाणेकर, नामदेव गडदरे, सुभाष आव्हाड, विकास कदम, शिवा धांडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | The Chandannagar police have caught the fugitive accused in the attempted murder

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Khushi Kapoor | सध्या सोशल मीडियावर खुशी कपूरच्या फोटोने घातलाय धुमाकूळ; सोशल मीडियाचा पारा वाढला

Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला

Gulabrao Patil | मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपावरुन गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंवर संतापले, म्हणाले -‘आधी जावयाला जेल बाहेर काढा आणि मग…’