Pune Crime | कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीत फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अपहरण (Kidnapping) आणि खंडणी प्रकरणातील (Extortion) आरोपी कुख्यात गज्या मारणे टोळीतील (Gaja Marne Gang) आणखी एका सदस्याला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकने (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) नऱ्हे येथील नवले ब्रीजजवळ सापळा रचून अटक केली. 20 कोटी रुपयांचा खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण केल्या प्रकरणी गज्या मारणे टोळीवर मोक्का (MCOCA) कारवाई करण्यात आली आहे. मोक्का कारवाईनंतर (Pune Crime) आरोपी मयुर निवंगुणे फरार झाला होता.

 

मयुर राजेंद्र निवंगुणे Mayur Rajendra Niwangune (वय-24,रा. वसंत प्लाझा, नर्हे) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे. या गुन्ह्यातील अटक झालेला हा 6 वा आरोपी आहे. कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीने कात्रज येथून एका व्यवसायिकाचे अपहरण केले होते. त्यानंतर गज्या मारणे याने जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) देत 20 कोटी रुपये खंडणी मागितली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) गज्या मारणे याच्यासह पप्पू घोलप (Pappu Gholap), अमर किर्दत (Amar Kirdat), रुपेश मारणे (Rupesh Marne), सांगलीचा हेमंत पाटील (Hemant Patil) अशा 14 जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला. यापैकी चौघांना अटक केली आहे. चंदगडचा डॉ. प्रकाश बांदिवडेकर (Dr. Prakash Bandivadekar) याचा सहभाग आढळल्याने त्याला इंदूरहून अटक केली. (Pune Crime

 

या गुन्ह्यातील आरोपी मुयर निवंगुणे नऱ्हे येथील नवले ब्रीज (Navale Bridge) खाली येणार असल्याची माहिती दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे (Sumit Takpere) यांना मिळाली. पथकाने नवले ब्रीज परिसरात सापळा रचून आरोपी मयुर निवंगुणे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या ताब्यात त्याला दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम (Senior Police Inspector Rajendra Kadam)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil),
सहायक फौजदार शाहीद शेख, हवालदार निलेश शिवतरे,
पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, श्रीकांत दगडे, ऋषिकेश कोळप, तेजाराणी डोंगरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | The crime branch arrested the absconding accused in the notorious gangster Gagya Marne gang

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा