Pune Crime | घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपीच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, पाच गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भारती विद्यापीठ (Bharati Vidyapeeth) आणि कोथरूड (Kothrud) परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईताला गुन्हे शाखा युनीट दोनने (Crime Branch Unit Two) पंढरपूरातून अटक (Arrest) केली. त्याच्याकडून पाच गुन्हे उघडकीस आणून 5 लाख 47 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. शमशुद्दीन जंबुवाले (रा. कर्वेनगर कोथरूड, मूळ- मु. पो. गंदेगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक केलेल्याचे (Pune Crime) नाव आहे.

घरफोडीच्या (Burglary) गुन्हाबाबत युनीट दोनकडून तपास करण्यात येत होता. त्यावेळी भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणारा सराईत पंढरपूरात एका शेतकऱ्याकडे कामाला असल्याची माहिती पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी (Ujjwal Mokashi) आणि गजानन सोनुने (Gajanan Sonune) यांना मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Senior Police Inspector Kranti Kumar Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंढरपूरातून जंबुवाले याला ताब्यात घेतले. (Pune Crime) चौकशीत त्याने पाच ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 5 लाख 47 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिली आहे.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil),
सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosle), विशाल मोहिते (API Vishal Mohite)
पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble), राजेंद्र पाटोळे (PSI Rajendra Patole)
पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी, संजय जाधव, गजानन सोनुने, मोहसीन शेख, उत्तम तारू, नागनाथ राख,
साधना ताम्हाणे, रेश्मा उकरंडे, शंकर नेवसे, गणेश थोरात, विजय पवार, विनोद चव्हाण, नामदेव रेणुसे,
कादिर शेख, समीर पटेल, प्रमोद कोकणे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | The crime branch of the accused in the house burglary opened the door, revealed five crimes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांचे ‘एका दगडात दोन पक्षी’, गडचिरोलीत नक्षलवाद्यांना इशारा देताना उद्धव ठाकरेंवर देखील साधला निशाणा

Gunaratna Sadavarte | ‘सामना’वर बंदी आणण्याची सदावर्ते यांची आरएनआयकडे मागणी, ‘या’ कारणावरून केला आरोप