Pune Crime | विभक्त झाल्यानंतर 3 वर्षांनी कौटुंबिक छळाचा गुन्हा; जेलमध्ये असताना फ्लॅटमध्ये घुसून लाखोंचा लंपास, न्यायालयाच्या दणक्यानंतर 4 वर्षांनी दरोड्याचा FIR, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर ३ वर्षांनी पत्नीचे निधन झाले. त्याचे खापर फोडून तिच्या नातेवाईकांनी कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दिली. पतीला धमकावून त्याच्याकडून २०  लाख ५ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) तत्परतेने पतीला अटक करुन त्यांची तुरुंगात रवानगी केली. दरम्यान, तो तुरुंगात गेला असताना तिच्या नातेवाईकांनी पतीचे घराचे कुलूप तोडून घरातील सामान ट्रकमध्ये भरुन लुटून नेला. मात्र, हडपसर पोलिसांनी याची तक्रार घेतली नाही. शेवटी ४ वर्षाच्या प्रयत्नानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर (Pune Court Order) हडपसर पोलिसांनी दरोड्याचा (Robbery) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी गिरीश सुरजप्रसाद पांडे (वय ५१, रा. कॉसमॉस सोसायटी, मगरपट्टा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मृदला किशोर कालपीवार, सागर मृणाल पाठक, मृत्युंजय प्रकाश पाठक, सिद्धार्थ मृत्युंजय पाठक, आदित्य सोनी कालपीवार, इशांत पांडे (सर्व रा. मध्य प्रदेश) अंकुर सोनी, नितीन साहू (सर्व रा. हडपसर) व इतर ५ ते ६ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबतची माहिती अशी, फिर्यादी व त्यांची पत्नी मिनाक्षी हे जुलै २०१५ मध्ये विभक्त झाले. मिनाक्षी हिचे ७ जुलै २०१८ रोजी निधन झाले. तिचे पार्थिव मध्य प्रदेशात नेण्यासाठी फिर्यादीची मेव्हणी मृदला कालपीवार, मेव्हणा मृत्युंजय पाठक आले होते. त्यांनी फिर्यादी यांना धमकावून ९ लाख रुपयांचे २३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, इतर किंमती सामान, ८ लाख रोख, ७ हजार रुपयांचे परदेशी चलन, लॅपटॉप, ५ मोबाईल फोन, इतर कागदपत्रे, खरेदीच्या पावत्या असा २० लाख ५ हजार रुपयांचा माल जबरदस्तीने काढून घेतला. सासूने केलेल्या तक्रारीनुसार हडपसर पोलिसांनी तातडीने फिर्यादी याला अटक केली. त्यांची येरवडा कारागृहात रवानगी झाली. ते येरवडा कारागृहात असताना त्यांच्या सासरवाडीकडील लोकांनी ऑगस्ट २०१८ मध्ये फिर्यादी रहात असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून दोन ट्रकमध्ये घरातील संसारपयोगी वस्तू व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा ६ लाख ४६ हजार रुपयांचे समान ट्रकमध्ये भरुन घेऊन गेले.

ऑक्टोंबर २०१८ मध्ये ते येरवडा कारागृहातून सुटल्यावर त्यांना घरातील चोरीचा प्रकार समजला. त्यांनी चोरीस गेलेल्या वस्तूचा फोटो काढून हडपसर पोलिसांकडे तक्रार केली. घटस्फोटानंतर ३ वर्षानंतर निधन झालेल्या पत्नीचा कौटुंबिक छळाचा गुन्हा तातडीने दाखल करुन फिर्यादीला अटक करण्यात तत्परता दाखविणार्‍या हडपसर पोलिसांनी चोरी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला.
त्यामुळे त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. दरम्यान, कोरोना मुळे न्यायालयाची दरवाजेही जवळपास बंद होती.
नुकताच न्यायालयाने १५६ (३) नुसार फिर्यादी यांच्या तक्रारीचा तपास करण्याचा आदेश हडपसर पोलिसांना दिला.
त्यानुसार आता हडपसर पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : Pune Crime | The crime of domestic violence 3 years after the separation;
Lakhs of rupees infiltrated into a flat while in jail,
FIR of robbery 4 years after the court strike, find out the case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ तर, चांदी वधारली; जाणून घ्या लेटेस्ट रेट

 

Thackeray Government | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात उभारले जाणार सौरऊर्जा पार्क

 

Digital-Social Media Training Camp Pune | आगामी निवडणुकीत ‘डिजिटल कार्यकर्त्यां’मुळे मिळेल नवसंजीवनी; रविवारी पुण्यात डिजिटल कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर