Pune Crime | अपंगत्वाचे बनावट प्रमाणपत्र देणारा निघाला ससून हॉस्पीटलमधील डेटा एंट्री ऑपरेटर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अपंगत्वाबाबत शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी अनेक जण बनावट प्रमाणपत्र (Bogus Certificate) तयार करुन खर्‍या अंपगांवर अन्याय करीत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या. अंपगत्वाचे प्रमाणपत्र (Certificate of Disability) देण्याचा अधिकार ससून रुग्णालयाला (Sasoon Hospital) आहे. या ससूनमधूनच बनावट प्रमाणपत्र दिली जात असल्याचा आरोप होत होता. येथील डेटा एंट्री ऑपरेटरच (Data Entry Operator) हे बनावट प्रमाणपत्र देत असल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

 

ससून रुग्णालाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय ताराचंद जाधव Dr. Vijay Tarachand Jadhav (वय ३९) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bund Garden Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १२९/२२) दिली आहे. त्यावरुन सचिन चंद्रकांत बाजारे Sachin Chandrakant Bajare (वय ३८, रा. गाडीतळ, हडपसर – Gadital Hadapsar) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन बाजारे याला एच एम आय एस प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून ससून हॉस्पिटलमध्ये नेमलेले आहे. त्याच्याकडे अपंग प्रमाणपत्राचे कामकाज करण्यास देण्यात आले आहे. ससूनमधून बनावट प्रमाणपत्रे वितरित होत असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर तेथील प्रशासनाने चौकशी सुरु केली. त्यात डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून काम करणार्‍या सचिन बाजारे यानेच सांग सिंह यांना जाणीवपूर्वक बनावट अपंगत्व प्रमाण पत्र दिल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालावरुन ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षकांनी फिर्याद दिली असून पोलीस निरीक्षक सातपुते तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The data entry operator at Sassoon Hospital, who issued a fake disability certificate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा