Pune Crime | चालकाचे अपहरण करुन केली बेदम मारहाण; चौघांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात FIR

पुणे : Pune Crime | वाहनचालक म्हणून काम करीत असलेल्या एका तरुणाचे तीन ते चार जणांनी जबरदस्तीने सहा आसनीमधून अपहरण करुन घेऊन गेले़ त्यानंतर त्याला बेदम मारहाण करुन सोडून पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी स्वाती संजय कांबळे (वय २९, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३६४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तीन ते चार जणांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

हा प्रकार लोहगाव (Lohegaon) येथील फिर्यादीच्या घरासमोर २४  ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय श्रीमंत कांबळे (वय ३६) हे लोहगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर
राहतात. ते वाहनचालक म्हणून काम करतात. शनिवारी रात्री साडेअकरा वाजता काही जण आले.
त्यांनी संजय यांना हाक मारुन बाहेर बोलावले. त्यांना जबरदस्तीने सहा आसनी रिक्षात बसवून त्यांचे अपहरण केले.
त्यानंतर त्यांना मोकळ्या मैदानात नेऊन त्यांना बेदम मारहाण करुन ते पळून गेले.
याची माहिती मिळताच पोलिसांनी संजय कांबळे यांचा शोध घेतला असता ते जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मारहाण करणार्‍यांना ते ओळखत नव्हते. त्यांना मारहाण का करण्यात आली, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही़ सहायक पोलीस निरीक्षक लहाने (API Lahane)  तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | The driver kidnapped and brutally beat him; FIR against four in airport police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | नियोजित पत्नीला भेटायला आलेल्या तरुणाचे अपहरण करुन केली बेदम मारहाण; सिंहगड रोड पोलीस ठाण्यात FIR

Devendra Fadnavis | पीएफआयवर बंदी घालणार; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती ; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात सूचना

CM Eknath Shinde | ‘मिशन’ सोपे नव्हते, फडणवीसांना प्रत्यक्ष भेटायचो, दूरध्वनीवरून बोलणे शक्यच नव्हते, कारण आमचे दूरध्वनी टॅप…, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या आठवणी