Pune Crime | BMW कार चालकाची अरेरावी, भररस्त्यात तरुणीला केली बेदम मारहाण

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  पुण्यामध्ये (Pune Crime) एका बीएमडब्ल्यू कार चालकाने (BMW car driver) एका तरुणीला भररस्त्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. दुचाकीवरुन जात असताना बीएमडब्ल्यू कारचा धक्का लागल्याने कार हळू चालवा असे सांगितले. याचा राग आल्याने कार चालकाने तरुणीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील (Pune Crime) फातिमानगर चौकात घडला. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanawadi Police Station) बीएमडब्ल्यू कार चालकावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वैष्णवी ठुबे Vaishnavi Thube (वय -23) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एम.एच. 12 एम.क्यू 56) बीएमडब्ल्यू कारमधील एक महिला आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी दुचाकीवरुन तिच्या वहिनीसोबत जात होती.
फरासखाना (Faraaskhana) परिसरात आल्यानंतर बीएमडब्ल्यू कार चालकाने त्याची कार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन (traffic rules) करुन फिर्यादी यांच्या गाडीला पाठीमागून ओव्हरटेक केले.
त्यावेळी गाडीचा धक्का फिर्यादी यांच्या वहिनीच्या पायला लागला.

फिर्यादी तरुणीने कार चालकाला गाडी हळू चालवा असे सांगितले.
याचा राग आल्याने कार चालकाने काही अंतरावर तरुणीची गाडी अडवून शिवीगाळ केली.
तर फातिमानगर चौकात गाडी थांबवून गाडीतील लाकडी दांडक्याने तरुणीच्या खांद्यावर व पाठीवर बेदम मारहाण केली.
यामध्ये तरुणीच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून एका ठिकाणी हातला फॅकचर झाले आहे.
पुढील तपास वानवडी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | The driver of the BMW car beat the young woman to death

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Excise Officer Suspended | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील अधिकार्‍यासह 4 जण तडकाफडकी निलंबीत

Viral Video | ’तालिबान’ राजवटीत कॉमेडी करणे ’हराम’! गळा कापून कॉमेडियनची निर्घृण हत्या, व्हिडीओ वायरल

Porn Racket प्रकरणी अभिनेत्रीला अटक, मॉडेल्सना जबरदस्तीनं अश्लील व्हिडीओमध्ये काम करायला लावल्याचा आरोप