Pune Crime | धावत्या गाडीतून चालकाला दिले रस्त्यावर फेकून कार पळवली; पुणे -नगर रोडवरील खराडी बायपास चौकातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune Crime | प्रवाशांना घेण्यासाठी थांबलेल्या कारचालकाला मारहाण करुन त्याला लुटून अपहरण केले (Kidnapping Of Car Driver In Pune). काही अंतरावर चालत्या गाडीतून चालकाला फेकून देऊन कार चोरुन नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी संतोष नाना पवार (वय ३६, रा. भिंगार बस स्टँडजवळ, नगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात Viman Nagar Police Station (गु. रजि. १४३/२२) फिर्याद दिली आहे. ही घटना पुणे -नगर रोडवरील (Pune-Nagar Road) खराडी बायपास चौकातील (Kharadi Bypass Chowk) खासगी बस थांब्याजवळ शुक्रवारी पहाटे एक वाजता घडला. (Pune Crime)

फिर्यादी हे नगरला राहणारे असून प्रवाशांना घेऊन पुण्याला आले होते. नगरला जाणारे कोणी प्रवासी मिळतात का याची वाट पहात होते. त्यावेळी तिघे जण त्यांच्याजवळ आले. आमचा भाऊ मयत झाला आहे, तू आम्हाला लातूरला घेऊन चल असे सांगितले. त्यावर फिर्यादी यांनी मी खूप थकलो आहे. आता घरी निघालो आहे. मी कोठेही येणार नाही, असे बोलले. त्यावर त्यांच्यातील एकाने तुझा मर्डरच करतो, असे बोलून मारहाण करण्यास सुरुवात केली. सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन जखमी केले. खिशातील ३ हजार रुपये व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. जबरदस्तीने कार चालू करुन थोड्या अंतरावर फिर्यादी यांना चालत्या गाडीतून फेकून दिले. त्यांची कार घेऊन चोरटे पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक पाठक तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | The driver of the speeding car was thrown on the road and the car fled; Incident at Kharadi Bypass Chowk on Pune-Nagar Road

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा