Pune Crime | मोठ्या भावानेच केला लहान भावाचा गळा दाबून खून, पुण्यातील कोंढवा परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |  दारु पिऊन आई, बहिणीला शिवीगाळ (Abuse) करत असल्याच्या रागातून मोठ्या भावाने (Big brother) लहान भावाचा गळा दाबून खून (Murder) केल्याची घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे. ही घटना (Pune Crime) आज (शनिवार) सकाळी साडे सहाच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी मोठ्या भावाला पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे.

 

तेजस यशवंत भोसले Tejas Yashwant Bhosale (वय-25 रा. टिळेकर नगर, कोंढवा) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी आकाश यशवंत भोसले Akash Yashwant Bhosale (वय-29) याला कोंढवा पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. याबाबत मयत तेजस याची आई सुनिता यशवंत भोसले Sunita Yashwant Bhosale (वय-50) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हरिश शिळमकर (API Harish Shilamkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तेजस भोसले याला दारु पिण्याचे व्यसन (Addiction to Alcohol) होते. दारूच्या नशेत तो आई, बहिणीला शिवीगाळ करायचा. यावरुन आरोपी आकाश आणि तेजस यांच्यात वाद होत होते. रविवारी रात्री तेजस दारु पिऊन घरी आला. त्याने आई, बहिणीला शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला. दोघा भावांमध्ये वाद झाले. सतत आईला शिवीगाळ करत असल्याच्या राग आरोपीच्या मनात होता. त्याने तेजसचा गळा आवळून ढकलले. हा प्रकार रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास घडला.

तेजस दारुच्या नशेत पडला असेल असे आई आणि आरोपीला वाटले. त्यामुळे त्यांनी त्याला उठवले नाही.
सकाळी साडे सहा वाजता तेजस उठत नसल्याने त्याला ससून रुग्णालयात नेण्यात आले.
त्याठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. तेजस याच्या शवविच्छेदन अहवालातून त्याचा
गळा दाबून आणि ढकलून दिल्याने डोक्याला मार लागून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
कोंढवा पोलिसांनी आरोपी आकाश भोसले याच्यावर आयपीसी 302 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हरिश शिळमकर करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The elder brother strangulated the younger brother, incident in Kondhwa area of Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

IPL-2023 | टी-20 क्रिकेटमध्ये मोठे बदल ! आता आयपीएलमध्ये 15 खेळाडूंचा संघ मैदानात उतरणार

Devendra Fadnavis | ‘… तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार का?’ – राष्ट्रवादी

Dhananjay Munde | ‘अजित पवारच सरकारला शिस्तीत आणू शकतात’, पक्षाच्या मेळाव्यात धनंजय मुंडेंची फटकेबाजी (व्हिडिओ)