Pune Crime | 17 वर्षाच्या मुलीचा वडिलच पैसे घेऊन लावून देत होता विवाह; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार

0
381
Pune Crime The father of a 17 year old girl was arranging the marriage for money Shocking type of incident in kondhwa
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पती पत्नीचे पटत नसल्याने १७ वर्षाच्या मुलीला आपल्याकडे घेऊन जाऊन मुलाकडून २ लाख रुपये व अ‍ॅक्टिव्हा गाडी घेऊन अल्पवयीन मुलीचे बाप लग्न लावून (Minor Girl Marriage) देत असल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime )

 

याप्रकरणी एका ३४ वर्षाच्या महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ५४४/२२) दिली आहे. त्यावरुन ५४ वर्षाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ५४ वर्षाच्या अनिसबरोबर विवाह झाला होता.
त्यांना एक १७ वर्षाची मुलगी आहे. तिचा विवाह करण्याच्या उद्देशाने त्याने तिला प्रलोभने दाखवून ऑगस्ट २०१७ मध्ये औरंगाबाद (Aurangabad) येथे घेऊन गेला. तिचे औरंगाबाद येथील एका सादिक नावाच्या तरुणाबरोबर लग्न करण्याची जबरदस्ती केली. त्याबदल्यात त्याने सादिक याच्याकडून २ लाख रुपये व अ‍ॅक्टिव्हा गाडी घेतली मुलीने अशा लग्नाला विरोध केल्यावर तिला त्याने मारहाण केली. ही मुलगी संधी साधून आपल्या आईकडे पुण्यात परत आली. तिने आपल्या आईला घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | The father of a 17 year old girl was arranging the marriage for money Shocking type of incident in kondhwa

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा