Pune Crime | टोळक्याने दुकानात घुसून तोडफोड करीत पसरविली दहशत; वाकड येथील भूमकर चौकात घातला राडा

पुणे : Pune Crime | वाकडमधील भुमकर चौकात (Bhumkar Chowk, Wakad) एका टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून दुकानात शिरुन तोडफोड करीत गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने चोरुन नेले. (Pune Crime)

चौकातील तीन दुकानांची तोडफोड करत परिसरात दहशत पसरविली. याप्रकरणी भरत शिवलाल देवाशी (वय २५, रा. अंजना सोसायटी, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९०४/२२) दिली.आहे. त्यावरुन पोलिसांनी अनिकेत शिंदे ऊर्फ मोन्या (वय २३) व स्वप्नील शिंदे ऊर्फ सोन्या (वय २५, दोघे रा. केमसे वस्ती, वाकड) यांच्यासह त्यांच्या ८ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत देवाशी यांचे भूमकर चौकात भवानी सुपर मार्केट नावाचे स्टील भांडी व किराणाचे दुकान आहे.
सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता वाजण्याच्या सुमारास ते दुकानात असताना ३ ते ४ दुचाकीवरुन टोळके आले.
अनिकेत शिंदे व स्वप्नील शिंदे हे लोखंडी कोयते घेऊन त्यांच्या दुकानात जबरदस्तीने शिरले.
त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून भरत यांना दुकान बंद कर नाही तर जीवे मारुन टाकीन अशी धमकी देऊन
दुकानातील गल्ल्यातून ८०० रुपये जबरदस्तीने घेऊन गेले.
त्यांचे साथीदार दुकानाबाहेर हातात लाकडी दांडके घेऊन उभे होते.
त्यानंतर हे टोळके शेजारील पुणे हार्डवेअर अँड इलेक्ट्रीकल या दुकानात  गेले.
त्यांनी दुकानाचे मालक शिवम देवाशी यांना धाक दाखवून दुकानातील प्लॅस्टीक पेंटचे बकेटवर कोयत्याने मारुन ते तोडले.
दुकानातील साहित्य अस्तावस्त करुन टाकले.
त्यानंतर शेजारीच ममता स्वीटचे मालक प्रताप देवाशी यांच्या दुकानासमोर जाऊन दुकान बंद कर, नाही तर मारुन टाकीन अशी धमकी देऊन दुकानातील काच फोडून इतर साहित्याचे नुकसान केले.
त्यानंतर ते दुचाकीवरुन पळून गेले.

Web Title :- Pune Crime | The gang broke into the shop and spread terror by vandalizing it; Rada laid at Bhumkar Chowk in Wakad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur Crime | नातेवाईकांच्या WhatsApp वर ‘गुडबाय’ मेसेज टाकून तरुणीचा केला खून; तरुणाने विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न, कोल्हापूरातील धक्कादायक घटना

Shivsena On Shinde-Fadnavis Govt |शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारला गंभीर इशारा, दसरा मेळाव्याला परवानगी दिली नाही तर…

PCMC Recruitment | पिंपरी चिंचवड महापालिका नोकरभरती; 386 जागांसाठी सव्वालाखांहून अधिक उमेंदवारांचे अर्ज ; उमेदवारांना परिक्षा शुल्क भरण्यासाठी दिली मुदतवाढ