Pune Crime | मुलींनीच जबरदस्तीने वृद्ध आईच्या रुमचा घेतला ताबा, येरवडा पोलिसांकडून मुलींवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वृद्धापकाळात मुले ही आधार असताना चक्क दोन विवाहित मुलींनी (Married Girls) आपल्या आईची पालनपोषणाची जबाबदारी (Responsibility) असताना त्यांना घराबाहेर काढून त्यांचे सामान बाहेर फेकून देऊन रुमचा ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

 

याप्रकरणी येरवड्यातील (Yerwada) अशोकनगरमध्ये (Ashoknagar) राहणार्‍या 60 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी येरवडा व फलटण सातारा रोडवर (Phaltan Satara Road) राहणार्‍या दोन विवाहित मुलींवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी या ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens) असून त्यांची पालन पोषणची जबाबदारी त्यांच्या मुलीवर आहे.
आरोपी मुलींनी त्यांना कोणत्याही प्रकारे अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, वैद्यकीय सोयीसुविधा दिल्या नाही.
त्यांच्या पालन पोषणासाठी काही केले नाही.
आरोपी मुलींनी 28 एप्रिल रोजी फिर्यादी व फिर्यादीचे भाडेकरु यांचे घराचे कुलूप दगडाने तोडून रूम मध्ये प्रवेश केला.
रुममधील सर्व कपडे, भांडी, कपाट व इतर सर्व वस्तू हे रुमच्या बाहेर फेकून तोडून नुकसान केले.
त्यांच्याकडील कुलूप हे दोन्ही रुमला लावून रुमचा ताबा घेतला, म्हणून गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खटके (API Khatke) तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | The girls forcibly took possession of the old mothers room FIR against the girls by Yerwada police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा