Pune Crime | सराईत गुंडाने आपल्याच बहिणीच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; खडकी परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | वस्तीतील लोकांना शिवीगाळ का करतो, असे विचारणार्‍या स्वत:च्या बहिणीवर गुंडाने कोयत्याने डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. खडकी पोलिसांनी (Khadki Police Station) खूनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल करुन या गुंडाला अटक केली आहे.

 

ताहिर अजित इराणी (वय ३३, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे या गुंडाचे नाव आहे.
याप्रकरणी राबिया अजिज इराणी (वय २८) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार पाटील इस्टेटमध्ये मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ताहिर आणि फिर्यादी राबिया हे बहिण भाऊ आहेत.
ताहिर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. ताहिर हा त्यांच्या येथील रहिवाशी व त्यांचे भावंडांना शिवीगाळ करीत होता.
हे पाहून राबिया यांनी त्याला तू शिवीगाळ का करतो, अशी विचारणा केली.
तेव्हा ताहिर याने तिला शिवीगाळ करुन कोयत्याने तिच्या डोक्यात वार करण्यासाठी हात उगारला.
डोक्यात वार (Pune Crime) केला असता फिर्यादी यांनी डावा हात समोर आणल्याने त्यांच्या मनगटाला कोयता लागून त्यात त्या जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :-  Pune Crime | The goon stabbed his own sister in the head with a scythe and tried to kill her Incidents in the rocky area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात ! मुंबईत आरोग्य सेवेवर परिणामाची शक्यता, राज्यातील 305 डॉक्टरांना कोरोनाची लागण

 

Fitness Tips | बॉलिवूड अभिनेता विकी कौशलकडून जाणून घ्या ‘या’ 5 फिटनेस टिप्स