Pune Crime | रिक्षाला धडक दिल्याचा जाब विचारल्याने गुंडाने रोखले पिस्तुल; कोंढवे धावडे येथील पेट्रोल पंपावरील घटना (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | पेट्रोल पंपावर रिक्षामध्ये पेट्रोल भरत असताना दोघे गुंड मोटारसायकलवरुन आले़ रिक्षाला धडक दिल्याचा जाब विचारल्यावरुन गुंडाने आपल्याकडील पिस्तुल काढून रिक्षाचालकाच्या छातीवर धरुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Pune Crime) केला. कोंढवे-धावडे (kondhawe dhawade) येथील धावडे पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला.

याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी (Uttam Nagar Police) संदीप मोहन सावंत (वय २६) आणि स्वरुप संगपाल आवटे (वय १९, दोघे रा. उत्तमनगर) यांना अटक केली आहे. याप्रकरणी समीर संजय घुमे (वय २८, रा. कुडजे गाव) यांनी उत्तमनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

 

 

संदीप सावंत हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) असून त्याच्याविरुद्ध खुन तसेच खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केलेल्याचे २ गुन्हे दाखल (Pune Crime) आहेत. त्याच्याविरुद्ध ७ – ८ गुन्हे दाखल असून उत्तमनगर परिसरात तो दहशत माजवत असतो. धावडे पेट्रोल पंपावर सोमवारी रात्री साडेआठ वाजता समीर घुमे हे रिक्षामध्ये पेट्रोल भरत होते. त्यावेळी संदीप सावंत व स्वरुप आवटे हे मोटारसायकलवरुन आले. त्यांनी रिक्षाला धडक दिली. त्याचा घुमे यांनी जाब विचारल्यावर संदीप याने सरळ आपल्याकडील पिस्तुल काढून घुमे यांच्या छातीला लावले. त्यामुळे घाबरुन घुमे हे उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या (Uttam Nagar Police Station) दिशेने पळत जाऊ लागले. तेव्हा त्यांचा पाठलाग करुन जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्यावर पिस्तुल रोखले. तेथे जमलेल्या लोकांना शिवीगाळ करुन दहशत माजवली. सहायक पोलीस निरीक्षक रोकडे तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | The goon stopped the pistol after asking for an answer to hit the rickshaw; Incident at petrol pump at Kondhve Dhavade

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Sanjay Raut | ‘गुजरातमध्ये 21 हजार कोटींच हेरॉईन सापडलं, मग आता तोंडात बोळा कोंबून का बसलेत?’ – संजय राऊत

Mumbai High Court | वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश

Pune Crime | शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपोषण करु नये म्हणून पत्नीचा गळा दाबून मंगळसुत्र चोरले

Air Marshal V. R.Choudhary | ‘एअर मार्शल व्ही. आर. चौधरी’ होणार भारताचे नवे वायूदल प्रमुख