Pune Crime | सराईत गुंडाने तरुणाच्या डोक्यात रॉड मारुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न; भारती विद्यापीठ परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भांडणात मध्ये पडल्याने एका तरुणाला खूपच महागात पडले आहे. एका सराईत गुंडाने या तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड काढून लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केला आहे. (Pune Crime)

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati Vidyapeeth Police Station) सुरज दिगंबर शेजवळ Suraj Digamber Shejwal (वय २७, रा. निसर्ग अपार्टमेंट, आंबेगाव खुर्द) या सराईत गुंन्हेगाराला अटक केली आहे. त्याचा साथीदार किरण मोरे याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

याप्रकरणी मानव सुधीर कर्पे (वय २४, रा. बालाजीनगर) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, मानव कर्पे यांनी एका भांडणात मध्यस्थी केली होती. १२ जानेवारी रोजी रात्री दहा वाजता ते कात्रजमधील मस्तान हॉटेलसमोरुन जात असताना किरण मोरे व सुरज शेजवळ यांनी त्यांना आडवले. तू आमच्या भांडणात का आला. आज तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून किरण मोरे याने लोखंडी रॉड काढून फिर्यादीच्या डोक्यात मारुन रक्तबंबाळ (Pune Crime) केले. सुरज शेजवळ याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन खाली पाडून जोरात गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | The goon tried to kill the young man by hitting him on the head with a rod; Bharati Vidyapeeth Police Station Case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

Income Tax Return | IT रिटर्न भरण्याची डेडलाइन आता 15 मार्च

Pune Corporation | समाविष्ट 23 गावांतील ‘त्या’ सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बिल्डरांचीच अन्यथा…

AICTS Pune Recruitment 2022 | 3 री उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी ! पुण्यातील सरकारी इन्स्टिटयूटमध्ये भरती; जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवर SC चे कडक ताशेरे, ‘महाविकास’ सरकारच्या अडचणी वाढवणारं निरीक्षण नोंदवलं

TET Exam Scam | अश्विनकुमारचा धक्कादायक खुलासा ! अभिषेक सावरीकर यानेच दिले 5 कोटी रुपये; सावरीकरच्या पोलीस कोठडीत वाढ

Ajit Pawar | महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय, अजित पवारांनी दिले ‘हे’ तातडीचे निर्देश

Anti Corruption Bureau Pune | 10 हजाराची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यासह खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात