Pune Crime | हॉटेल मॅनेजरने घातला साडेतीन लाखांना गंडा; मंगळवार पेठेतील प्रकार

पुणे : Pune Crime | हॉटेलमध्ये मॅनेजर (Hotel Manager) म्हणून काम करणार्‍याने ग्राहकांकडून बिल स्वत:च्या बँक खात्यावर ऑनलाईन स्वीकारुन रजिस्टरमध्ये कमी किंमतीमध्ये हॉटेल बुक केल्याची नोंद करुन तब्बल ३ लाख ६९ हजार रुपयांना गंडा (Fraud Case) घातल्याचे समोर आले आहे. (Pune Crime)

याप्रकरणी राजन मनोहर अमीभावी Rajan Manohar Amibhavi (वय ५८, रा. वानवडी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७३/२२) दिली आहे. त्यानुसार संतोष पंढरीनाथ थर Santosh Pandharinath Thar (रा. संभाजीनगर, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवार पेठेतील कपिल रेसिडेन्सी लॉजमध्ये (Kapil Residency Lodge) ११ डिसेबर २०२१ ते ३१ जुलै २०२२ दरम्यान घडला. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष थर हा कपिल रेसिडेन्सी लॉज हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून नोकरी करीत होता. त्यावेळी ग्राहकाकडून येणारे हॉटेलचे बिल (Hotel Bill) त्याने वेळोवेळी स्वत:चे बँक खात्यावर ऑनलाईन स्वरुपात स्वीकारले. हॉटेलच्या कॅशबुक रजिस्टरमध्ये चुकीच्या व कमी किंमतीमध्ये हॉटेल बुकिंगच्या नोंद करुन वेळोवेळी अफरातफर करुन १ लाख ३९ हजार ५२१ रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Case) केली. तसेच हॉटेलच्या कॅश काऊंटरमधून फिर्यादीचे संमतीविना लबाडीच्या इराद्याने वेळोवेळी २ लाख ३० हजारांची रोकड चोरली. अशा प्रकारे ३ लाख ६९ हजार ५२१ रुपयांची फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक माळी (Assistant Police Inspector Mali) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | The hotel manager cheated three and a half lakhs; Type in Tuesday Peth Crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

CM Eknath Shinde | धक्कादायक! शिंदे गटात या…नाहीतर एन्काऊंटर!! माजी नगरसेवकाला मुख्यमंत्र्यांनी पोलिसांमार्फत दिली धमकी, कुटुंबासह आत्महत्येचा इशारा

Pune Crime | अग्नीपथ साठी बनावट डोमिसाईल काढून देणार्‍या दोघा एजंटांना अटक; मुंबई परिसरात रहात असल्याचे काढून दिले डोमिसाईल

Dasara Melava 2022 | शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत राष्ट्रवादीचे बॅनर्स; परंपरा अखंड राहू द्या म्हणत दिल्या शुभेच्छा