Pune Crime | फुकट बिर्याणी न दिल्याने हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार; पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हॉटेलमधून  फुकट बिर्याणी न दिल्याच्या कारणावरुन तिघा तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले (Attempt to Murder) व हॉटेलमधील तोडफोड केली. याप्रकरणी लक्ष्मण मरीबा सोनवणे (वय २४, रा. हॅप्पी कॉलनी, गोसावी वस्ती, कोथरुड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद दिली (Pune Crime) आहे.

 

त्यावरुन पोलिसांनी बाळा, तेजा, सत्या वानखेडे (Satya Wankhede) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. ही घटना हिंगणे खुर्द येथील रिबेल फुल्डर्स प्रा. लि. या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण सोनवणे हे रिबेल फुल्डर्स या हॉटेलच्या बाहेर थांबले होते. या वेळी आरोपींनी हॉटेलचे मॅनेजर बिरास्वर दास यांना फुकट बिर्याणी मागितली. त्यांनी बिर्याणी फुकट देण्यास नकार दिला. या कारणावरुन त्यांनी मॅनेजर दास यांच्या हातावर कोयता मारुन जखमी केले. तसेच सत्या वानखेडे याने कीचनमध्ये असलेल्या फ्रिजवर कोयत्याने मारुन नुकसान केले. तेजा याने गल्ल्यामध्ये हात घालून त्यातील ९४० रुपये चोरले. त्यानंतर परत जाताना हॉटेलमधील वस्तूंना दगड   फेकून मारुन नुकसान केले. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक संपकाळ तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The hotel manager was stabbed for not giving free biryani; Incident in Sinhagad Road area of ​​Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा