Pune Crime | 6 KG वजनाची मूर्ती सोन्याची असल्याचे भासवून सराफाची फसवणूक; कात्रजमधील निलेश धुमाळ अटकेत

पुणे : Pune Crime | भगवान गौतम बुद्धांची सोन्याची मृर्ती असल्याचे भासवून सराफ असलेल्या मित्राचीच २१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विश्रामबाग पोलिसांनी (Vishrambag Police) या मित्राला अटक केली आहे. मात्र, ज्याच्याकडून ही मूर्ती आणण्यात आली होती़ तो पैसे घेऊन पसार (Pune Crime) झाला आहे.

पोलिसांनी निलेश सदाशिव धुमाळ (Nilesh Sadashiv Dhumal) (वय ३१, रा. हनुमाननगर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव असून खिम थापा (Khim Thapa) (वय ४०, रा. पालघर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रविण रेवणकर (Pravin Revankar) (वय ४३, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. प्रविण रेवणकर आणि निलेश धुमाळ हे मित्र आहेत. धुमाळ यांनी रेवणकर यांना मुंबईतील एकाकडे सोन्याची भगवान गौतम बुद्धाची मूर्ती असल्याचे सांगितले. मूर्तीचे ५० लाख रुपये द्यावे लागतील. अगोदर २५ लाख रुपये देण्याचे ठरले. त्यावर फिर्यादी यांनी ती मूर्ती सत्यता पडताळून आणण्यास सांगितले होते. त्यानुसार, गुरुवारी सकाळी निलेश धुमाळ व खिम थापा हे ६ किलो वजनाची गौतम बुद्ध यांची मूर्ती घेऊन आले.

त्यांनी मूर्तीवर पावडर टाकून चेक करुन आणण्याऐवजी दुसरीच कोणती तरी सोन्याची पावडर चेक करुन मूर्तीत ६५ ते ७२ टक्के सोने असल्याचा रिपोर्ट आणला होता. त्यावर फिर्यादी यांनी विश्वास ठेवून त्यांनी थापा याच्याकडे २१ लाख रुपये दिले व त्यांना थांबायला सांगून मूर्ती घेऊन ते तपासणीसाठी गेले. तोपर्यंत हा थापा २१ लाख रुपये घेऊन निघून गेला. रेवणकर यांनी मूर्तीची तपासणी केली तर ती सोन्याची नसून तांब्याची असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांनी २१ लाख रुपयांच्या फसवणूकीची फिर्याद दिली. पोलिसांनी निलेश धुमाळ याला अटक केली असून थापा याचा शोध घेतला जात आहे.

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘नमो’ मंदिराबाबत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी, म्हणाले – ‘पुणेकरांनी नाव ठेवण्यात देवांनाही सोडलं नाही’

Parambir Singh | परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यातील गुन्हाही सीआयडीकडे?

Honey Trap Racket Pune | ‘हनी ट्रॅप’ करणार्‍या तरुणीने मांजरीतील तरुणालाही 20 लाखांना लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार उघड

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pune Crime | The idol weighing 6 KG was deceived by a bullion pretending to be gold; Nilesh Dhumal arrested in Katraj

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update