Pune Crime | पुण्यात भाईगिरी ! जेलमध्ये असतानाची हप्ता वसुली बुडाली; कारागृहातून बाहेर आल्यानंतर पान टपरी चालकाच्या खूनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पोलिसांनी आरोपीला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केली होती. त्यामुळे त्याचा पाच ते सहा महिने कारागृहात मुक्काम होता. आता जामिनावर सुटल्यानंतर या मधल्या काळातील थकलेला हप्ता देण्याची मागणी त्याने दुकानदारांकडे केली. पान टपरी चालकाने हप्ता देण्यास नकार दिल्याने त्याने साथीदारांच्या मदतीने या पान टपरीचालकावर तलवारीने वार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न (Pune Crime) केला.

 

मंगेश अनिल माने (वय २३, रा. सुखसागरनगर), अखिलेश ऊर्फ लाड्या कलशेट्टी (रा. गोकुळनगर) सुरज बोकेफोडे (रा. माऊलीनगर), सागर जाधव (रा. सुखसागरनगर) आणि त्याच्या दोन साथीदारांवर कोंढवा पोलिसांनी (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल केला आहे. अनिल रमेश चव्हाण (वय २०, रा. अप्पर इंदिरानगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (Pune Crime) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश माने हा सराईत गुंड असून बिबवेवाडी पोलिसांनी (Bibvewadi Police Station) त्याला खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक केली होती.
त्यात तो पाच ते सहा महिने कारागृहात होता. तो नुकताच जामिनावर बाहेर आला आहे.
अनिल चव्हाण यांची कोंढव्यातील साळवे गार्डन (Salve Garden, Kondhwa) येथे पान टपरी आहे.
त्याने फिर्यादी अनिल चव्हाण यांची भेट घेतली. पान टपरी सुरु ठेवायची असेल तर तो कारागृहात असलेल्या काळातील थकलेले हप्ते दे, अशी मागणी केली.
पैसे देण्यास चव्हाण यांनी नकार दिल्याने माने व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन तलवारीने वार केला.
त्याला सोडविण्यासाठी आलेल्या मित्रावरही तलवारीने वार केले.
कोंढवा पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील (API Swaraj Patil) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | The installment recovery while in jail; Attempted murder of pan shop owner r after his release from jail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘गेम केल्याशिवाय चप्पल न घालण्याची शपथ’ ! पुण्याच्या डुक्कर खिंडीत बिल्डरवर गोळीबार करणार्‍याला करमाळ्यावरुन अटक

Pune Crime | पुणे पोलिसांकडून किरण गोसावीची महिला असिस्टंट शेरबानो कुरेशीला मुंबईतून अटक

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकतात एकाचवेळी 3 गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या नवीन अपडेट