Pune Crime | गळ्यातील दागिने हिसकावतात म्हणून बॅगेत ठेवले, चोरट्यांनी बॅगच पळविली; कर्वेनगरमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गळ्यातील मंगळसुत्र, दागिने मोटारसायकलवरुन आलेले चोरटे हिसकावितात, म्हणून महिलेने आपले दागिने बॅगेत ठेवले होते. त्यानंतर त्या पायी जात असताना चोरट्यांनी दागिने असलेली हँड बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. (Pune Crime)

 

कर्वेनगरमधील (Karve Nagar, Pune) शाहु कॉलनीतील गल्ली क्रमांक २ मध्ये शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता ही घटना घडली. (Pune Crime)

 

या प्रकरणी कर्वेनगरमध्ये राहणार्‍या एका २६ वर्षाच्या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या रात्री पायी घरी जात होत्या. शाहु कॉलनीतील गल्ली क्रमांक २ मध्ये त्या आल्या असताना मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेली हँड बॅग हिसका मारुन चोरुन नेली. बॅगेमध्ये १ लाख २९ हजार रुपयांचे ३० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, १० हजार रुपयांचा मोबाईल, १ हजार रुपये रोख असा १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज होता. सहायक पोलीस निरीक्षक रायकर तपास करीत आहेत.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | The jewelry was snatched from the neck and kept in the bag the thieves snatched the bag Incident in Karvenagar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा