Pune Crime | कर्ज वितरण अधिकाऱ्याने बँकेला घातला 32 लाखांचा गंडा, बँक ऑफ बडोदाच्या लक्ष्मी रोड शाखेतील प्रकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बँकेत कर्ज वितरण अधिकारी (Loan Disbursement Officer) म्हणून कार्यरत असताना आपल्या पदाचा दुरुपयोग करुन बँकेला 32 लाख 16 रुपयांचा गंडा (Fraud Case) घातल्याचा प्रकार पुण्यातील (Pune Crime) बँक ऑफ बडोदाच्या (Bank of Baroda) लक्ष्मी रोड शाखेत (BOB Laxmi Road Branch) उघडकीस आला आहे. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) मिथुल शांतिलाल पटेल (Mithul Shantilal Patel) याच्याविरुद्ध IPC 420,406 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याप्रकरणी मंगेश चंद्रकांत कुलकर्णी Mangesh Chandrakant Kulkarni (वय-56 रा. सिंहगड रोड-Sinhagad Road, पुणे) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मिथुल शांतिलाल पटेल (रा. नेहा क्लासिक, काकडे वस्ती, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 28 डिसेंबर 2018 ते 22 जुलै 2019 या कालावधीत बँक ऑफ बडोदाच्या लक्ष्मी रोड शाखेत घडला आहे. (Pune Crime)

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर (API Tukaram Nimbalkar) यांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपी मिथुल पटेल हे बँक ऑफ बडोदाच्या लक्ष्मी रोड शाखेत कर्ज वितरण अधिकारी म्हणून कार्यरत होते.
कर्ज वितरण अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी डिसेंबर 2018 ते जुलै 2019 या कालावधीत
पदाचा दुरुपयोग करुन 7 खातेधारकांच्या खात्यातील पैसे स्वत:च्या आणि पत्नीच्या खात्यात वर्ग करुन
बँकेची व खातेदारांची 32 लाख 16 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) केली.
दरम्यान, बँकेचे ऑडिट झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The loan disbursement officer gave the bank a bribe of Rs 32 lakh, in the Laxmi Road branch of Bank of Baroda

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा