Pune Crime | कमी व्याज दराच्या आमिषाने पावणे दोन लाखांची झाली फसवणूक; स्वारगेट पोलीस ठाण्यात FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | व्याजाचा दर जास्त असल्याने एका रिक्षाचालकाने (Rickshaw Driver) बजाज फायनान्सने (Bajaj Finance) दिलेले कर्ज (Loan) परत केले. त्यानंतर १ टक्का व्याजाने २५ लाख रुपयांचे कर्ज देण्याचे आमिषाने (lure of lending) महिलेने त्याला तब्बल १ लाख ७९ हजार रुपयांना चुना (Cheating Case) लावल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी गुलटेकडी (Gultekdi, Pune) येथे राहणार्‍या एका ५५ वर्षाच्या रिक्षाचालकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५७/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे बांधकाम ठेकेदार (Construction Contractor) व रिक्षाचालक आहेत.
त्यांनी २०२१ मध्ये बजाज फायनान्सकडून १ लाख ३६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.
मात्र, व्याज दर जास्त असल्याने त्यांच्या खात्यावर जमा झालेल्या रक्कमेचा धनादेश (Check) त्यांनी वाकडेवाडी येथील कार्यालयात जाऊन जमा केला होता.
त्यानंतर त्यांना रिहाणा शर्मा (Rihanna Sharma) असे नाव सांगणार्‍या महिलेचा २९ ऑक्टोबर २०२१ रोजी फोन आला.
मी बजाज फायनान्समधून बोलत असून आम्ही तुम्हाला १ टक्के दराने २५ लाख रुपये कर्ज देतो, असे सांगितले.
त्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी कागदपत्रे शर्मा यांच्या व्हॉट्सॲपवर पाठविली.
त्यानंतर त्यांनी प्रोसिजर फी म्हणून ६ हजार ८५० रुपये भरायला लावले. त्यानंतर कर्जाचे तीन हप्ते अगोदर भरायला लागतील.
कर्ज विम्यासाठी ३० हजार रुपये भरायला भाग पाडले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून १ लाख ७९ हजार ६४२ रुपये घेऊन कोणतेही कर्ज न देता फसवणूक (Fraud Case) केली. शेवटी त्यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.

 

 

Web Title : – Pune Crime | The loan was taken as the interest rate was high and by the lure of low interest rate two lakhs was cheated FIR in Swargate police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा