Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून ठेवले शरीर संबंध; २५ लाखांचे कर्ज घेऊन केले दुसर्‍याच तरुणीशी लग्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शादी डॉट कॉमवरुन (Shaadi) ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून त्याने तिच्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. तिच्या मोबाईलवरुन २५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. प्रत्यक्षात दुसर्‍या तरुणीबरोबर लग्न करुन फसवणूक (Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी खराडी येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २७२/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शांतनु बाळासाहेब महाजन Shantanu Balasaheb Mahajan (वय २८, रा. न्याती इलेशिया, थिटेनगर, खराडी) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार २८ मार्च २०२२ पासून आजवर सुरु होता. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाली. शांतनुने फिर्यादीशी मैत्री करुन त्यांना लग्नाचे आमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याशी शारीरीक संबंध ठेवले. त्या दरम्यान फिर्यादीच्या मोबाईलवर फिर्यादीच्या नावे वेगवेगळे अ‍ॅप डाऊनलोड करुन त्यावरुन वेळोवेळी कर्ज व पैसे घेऊन एकूण २५ लाख रुपयांची रक्कम घेतली. ती खर्च केली. फिर्यादीसोबत लग्न न करता दुसर्‍या तरुणीबरोबर लग्न केले. हे समजल्यावर आपली फसवणूक (Cheating Case) झाल्याचे लक्षात आल्यावर या तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The lure of marriage kept the carnal relationship;
He got married to another girl with a loan of 25 lakhs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा