Pune Crime | वीज कट केल्याने महावितरणच्या अधिकार्याला बेदम मारहाण, केले फ्रॅक्चर

पुणे : Pune Crime | बील न भरल्याने वीज पुरवठा खंडीत केल्याने महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला स्टीलच्या रॉडने मारहाण करुन त्याचे बोट फ्रॅक्चर करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)
याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश विठ्ठल इंडे (वय ३९) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ३६०/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुशिल जालिंदर नवले (वय ३५, रा. पराशर सोसायटी, पठारे वस्ती, नगर रोड) याला अटक केली आहे. ही घटना पराशर सोसायटीत बुधवारी दुपारी सव्वा बारा वाजता घडली. (Pune Crime)
फिर्यादी हे महावितरण कंपनीत अधिकारी असून त्यांचे शाखा कार्यालयामार्फत ते पराशर सोसायटीत वीज बिल भरणा
केला आहे की नाही हे पाहण्यासाठी गेले होते.
यावेळी सुशिल नवले याचे वीज मीटरचे कनेक्शन कट केल्याचा राग असल्याने त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ करुन घरातील स्टीलच्या रॉडने मारहाण केली. त्यात त्यांच्या हाताचे बोट फ्रॅक्चर झाले.
आमच्या एरियात लाईनमन आला तर मी त्याचे हात पाय मोडीन. त्याला सोडणार नाही असे म्हणून धमकी दिली.
पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणून गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करुन नवले याला अटक केली
आहे.
सहायक पोलीस निरीक्षक पाठक अधिक तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime | The Mahavitran officer was brutally beaten and fractured due to power cut
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Politics | शिवसेनेची नवीन टॅगलाईन! ‘बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’