Pune Crime | ‘ऑक्सीटोसिन’ची विक्री करणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधारला गुन्हे शाखेने मुंब्रा येथून केली अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गाई आणि म्हशीच्या दूधवाढीसाठी ‘ऑक्सीटोसिन’ औषधाचा (Oxytocin Drug) बेकायदा वापर होत असल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. या औषधाची निर्मिती, साठवणूक तसेच विक्री करणाऱ्या परराज्यातील पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक एकने (Anti Narcotics Cell) काही दिवसांपूर्वी अटक (Arrest) केली होती. या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला (Pune Crime) गुन्हे शाखेने मुंब्रा ठाणे (Mumbra Thane) येथून अटक केली आहे.

 

बाबुभाई उर्फ अल्लाउद्दीन लस्कर Babubhai alias Allauddin Laskar (रा. कल्याण ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Vimantal Police Station) हद्दीतील कलवड वस्ती येथील कारखान्यावर शनिवारी (दि.5) छापा टाकून पाच जणांना अटक केली होती. या ठिकाणी ‘ऑक्सीटोसिन’ची अवैध निर्मिती केली जात होती. (Pune Crime)

 

पथकाचे पोलीस गुन्ह्याचा तपास करत असताना या टोळीचा मुख्य सुत्रधार बाबुभाई हा मुंब्रा ठाणे येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना मिळाली. आरोपीचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी (दि.11) एक पथक मुंब्रा ठाणे येथे रवाना करण्यात आले. पथकाने मुंब्रा येथील अमृतनगर परिसरातून आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad),
सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale),
शैलजा जानकर (API Shailaja Jankar), पोलीस अंमलदार सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी,
सचिन माळवे, पांडुरंग पवार, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, राहुल जोशी, संदिप शिर्के,
रेहाना शेख, विशाल शिंदे, संदेश काकडे, योगेश मोहिते, नितेश जाधव यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | The main facilitator of the gang selling ‘Oxytocin’
was arrested by the Crime Branch from Mumbra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा