Pune Crime | मंगळवार पेठेत उधार दारु न दिल्याने मॅनेजरला मारहाण करुन गल्ल्यातील रोकड लांबविली; सराईत गुन्हेगारासह तिघांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | उधार दारु मागितल्यानंतर ती देण्यास नकार दिल्याने सराईत गुंडाने आपल्या साथीदारांसह दुकानात शिरुन मॅनेजरला मारहाण करुन गल्ल्यातील १६ हजार रुपये जबरदस्तीने चोरुन नेले. तसेच दुकानातील टेबल, बाकडे, काचेचे ग्लास यांची तोडफोड केली. (Pune Crime)

याप्रकरणी परशुराम अर्जुन चिंचोळे (वय २३, रा. तळजाई पठार (Taljai Pathar, धनकवडी – Dhankawadi) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८४/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी महेश तनपुरे (रा. सोमवार पेठ), सागर नायडू ऊर्फ टकल्या (रा. मंगळवार पेठ), परश्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सागर नायडू हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार पेठेत (Mangalwar Peth, Pune) कळमकर देशी दारुचे दुकान (Deshi Daru Shop) आहे. तेथे परशुराम चिंचोळे हे मॅनेजर आहे. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता ते दुकानात असताना तिघे जण आले. महेश तनपुरे याने उधारीवर दारु मागितली. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा त्यांनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. गल्ल्यातील १६ हजार रुपयांची रोकडे जबरदस्तीने काढून घेतली. दुकानातील टेबल, बाकडे, काचेचे ग्लास यांची तोडफोड केली.

यावेळी मोठ मोठ्याने आरडा ओरडा करुन सागर नायडू हा आमचा भाई आहे, तुला खलास करीन, अशी धमकी देऊन मालकाच्या दुचाकीची तोडफोड करुन परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे परिसरातील लोकांनी घाबरुन आपली दुकाने बंद करुन पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime | the manager was beaten up for not giving deshi liquor on loan and the cash in the street was taken away; mangalwar peth samarth police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त