×
Homeक्राईम स्टोरीPune Crime | टोळक्याने मारहाण करुन वर्गणीचे पैसे लुटले; कोथरुड परीसरातील घटना

Pune Crime | टोळक्याने मारहाण करुन वर्गणीचे पैसे लुटले; कोथरुड परीसरातील घटना

पुणे : Pune Crime | भवानी माता मंडळाच्या (Bhavani Mata Mandal) महाप्रसादाची वर्गणी देण्यासाठी आणलेले पैसे गुंडांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण (Beating) करुन जबरदस्तीने लुटून नेली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी (Kothrud Police) ५ जणांवर दरोड्याचा गुन्हा (FIR) दाखल केला असून दोघा गुंडांना अटक (Arrest) केली आहे. (Pune Crime)

याप्रकरणी अक्षय हरीदास साठे Akshay Haridas Sathe (वय २७, रा. श्रमिक वसाहत, हनुमाननगर, कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २३३/२२) दिली आहे. हा प्रकार हनुमाननगरमधील भवानी माता प्रतिष्ठान मंडळासमोर १ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा वाजता घडला.

पोलिसांनी सुरेश ऊर्फ बल्ली वाजे Suresh alias Bally Waje (वय २४, रा. आंबेगाव पठार) आणि अक्षय वाळुंज Akshay Valunj (वय २६, रा. कोथरुड) या सराईत गुडांना अटक केली आहे. साहिल जगताप (Sahil Jagtap), सागर येनपुरे (Sagar Yenpure) व त्यांच्या साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय साठे हे पुणे महापालिकेच्या (PMC) अतिक्रमण विभागात (Encroachment Department) कंत्राटी कामगार म्हणून काम करतात. त्यांच्या वस्तीमध्ये भवानी माता प्रतिष्ठान मंडळात नवरात्र उत्सव (Navratrotsav) सुरु आहे. ते रोजी रात्री देवीच्या आरतीनंतर मित्र गणेश कानाडे, विशाल काकडे यांच्याबरोबर महाप्रसादाचे नियोजन करत गप्पा मारत बसले होते. त्यावेळी त्यांनी मंडळाचे महाप्रसादासाठी वर्गणी देण्यासाठी घरातून आणलेले १० हजार रुपये पँटच्या खिशात ठेवले होते. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मंडळाजवळ सुरेश वाजे, साहिल जगताप, अक्षय वाळुंज, सागर येनपुरे आले.

त्यावेळी साहिल जगताप याने फिर्यादीला ‘‘तु माझ्या भावाला मारले होते ना,’’ असे बोलून त्यांच्या कानाखाली मारली.
त्यावेळी त्याचे सोबत असलेल्या सागर याने ‘‘तु याचे भावाला मारले होते ना, मग आम्हाला एक लाख रुपये
आताच्या आता आणून दे, नाही तर तुला जिवंत सोडणार नाही,’’ असे बोलून त्यांच्या पँटच्या खिशामध्ये हात घालून महाप्रसादासाठी आणलेले १० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
हातातील कोयता दाखवून ‘‘अजुन काय असतील तर लवकर दे,’’ असे म्हणाला.
त्यावर फिर्यादी याने ‘‘कोठून पैसे आणून देऊ, मी काय केले आहे. तुम्ही मला का पैसे मागता,’’ असे म्हणाला.
तेव्हा सर्वांनी मिळून हाताने मारहाण केली. त्यावेळी त्यांचे मित्र गणेश कानाडे, विशाल काकडे यांनी
‘‘याला कशाला मारता मारु नका,’’ असे म्हणाले. तेव्हा सागर येनपुरे याने हातातील कोयता त्यांना दाखवून
‘‘तुमचा काय संबंध नाही. निघुन जायचे नाही तर तुम्हाला सोडणार नाही,’’ असे बोलला.
त्यामुळे दोघेही भितीने तेथून पळून गेले. त्यांच्या तावडीतून सुटून फिर्यादीही भितीने पळून घरी गेले.
त्यानंतर त्यांनी आता पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक पांढरे (Sub-Inspector of Police Pandhare) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | The mob beat and robbed the subscription money; Incidents in Kothrud area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shivpal Singh | भालाफेकपटू शिवपाल सिंग उत्तेजक द्रव्य सेवनप्रकरणी दोषी; 4 वर्षाची बंदी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करुन घडवून आणला गर्भपात; तरुणाविरुद्ध बलात्काराबरोबरच अ‍ॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News