Pune Crime | ओळख कशाला करुन देतो, असे म्हटल्याने टोळक्याने मारहाण करुन केली तोडफोड; वारजे माळवाडीमधील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   Pune Crime | दुकानात बोलावून दोघांशी ओळख करुन देत असताना कशाला ओळख करुन देतो, असे बोलल्याने टोळक्याने एकाला लोखंडी रॉड, बांबुने मारहाण करुन घरात तोडफोड (Pune Crime) करण्यात आली.

याप्रकरणी पोलिासंनी चौघांना अटक केली आहे. सचिन शिंदे (वय २१), नितिन जमादार (वय ३२), अमित प्रसाद (वय ३२), रोहित काळे (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी विठ्ठल निवृत्ती कुरपे (वय ४७, रा. सरगम सोसायटी, कर्वेनगर) यांनी वारजे पोलिसांकडे (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपी सचिन शिंदे याने त्याच्या ट्रिक शॉप शा दुकानात शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास बोलावले.
त्यावेळी दुकानात नितिन जमादार व अन्य दोघे होते. सचिन शिंदे हा इतरांची ओळख करुन देत होता.
त्यावेळी कुरपे यांनी माझेशी कशाला ओळख करुन देतो, असे बोलले.
त्यावरुन राग आल्याने त्यांनी लोखंडी रॉड, बांबु घेऊन फिर्यादीच्या घराचे लोखंडी गेटवर मारुन घराचे गेटवर मारुन खिडक्याचे काचा
व कुंड्या फोडल्या़ दुचाकीची हेडलाईट काच फोडून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक होळकर तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | The mob beat him up and vandalized him, saying what makes him famous; Incident at Warje Malwadi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra Cinema Hall Reopen | राज्यातील सिनेमा हॉल, थिएटर्स 22 ऑक्टोबरपासून सुरु होणार

Pune Crime | अनैतिक संबंधातून 17 वर्षाच्या मुलीने दिला मुलाला जन्म; 20 वर्षीय बाप आला ‘गोत्यात’

DGP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, 4 डीसीपी, काही एसीपींसह 25 पोलिस अधिकारी ‘गोत्यात’, निलंबनाच्या हालचालींना वेग; जाणून घ्या प्रकरण