Pune Crime | व्याजाने दिलेल्या पैशाच्या वसुलीसाठी दुकानात शिरुन जीवे मारण्याची धमकी, सावकार गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खासगी सावकाराकडून (Moneylender) कर्जदारांना त्रास देऊन अधिकचे व्याज वसूल करण्याचे प्रकार पुण्यात (Pune Crime) दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच एक प्रकार समोर आला आहे. सावकारीचा कोणताही परवाना नसताना 20 लाख रुपये व्याजाने (Interest) देऊन त्याच्या वसुलीसाठी दुकानात शिरुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी (Threat) दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांनी सावकाराला अटक (Arrest) केली आहे.

 

किशोर सदाशिव खळदकर Kishor Sadashiv Khaldakar (वय 38, रा. जातेगाव, ता. शिरुर Shirur) असे या सावकाराचे नाव आहे. याप्रकरणी नारायण रामलाल चौधरी Narayan Ramlal Chaudhary (वय 41, रा. योगेश्वर सोसायटी, वडगाव शेरी Wadgaon Sheri) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर खळदकर याने चौधरी यांना 20 लाख रुपयांचे कर्ज 10 टक्के व्याजाने दिले. त्यानंतर फिर्यादीस वारंवार फोन करुन पैसे देण्यासाठी तगादा लावून न दिल्यास जीवे ठार मारण्याच्या धमक्या देऊन शिवीगाळ केली. शिक्रापूर (Shikrapur) येथील बाबा गारमेंट नावाच्या दुकानामध्ये फिर्यादी नसताना जबरदस्तीने आत येऊन मुद्दल व व्याजाचे पैसे देण्याच्या कारणावरुन फिर्यादीच्या भावाला व कामगारांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्याजवळ फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी यांनी गुन्हे शाखेकडे धाव घेतली. पोलिसांनी खळदकर याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | The moneylender threatened to kill him by entering the shop to recover the interest paid

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा